google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रावर पुन्हा विजेचे संकट, ‘या’ कारणांमुळे बत्ती गुल होणार..?

Breaking News

महाराष्ट्रावर पुन्हा विजेचे संकट, ‘या’ कारणांमुळे बत्ती गुल होणार..?

 महाराष्ट्रावर पुन्हा विजेचे संकट, ‘या’ कारणांमुळे बत्ती गुल होणार..?

राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. लवकरच महाराष्ट्राची बत्ती गुल होण्याची शक्यता असून, त्यामुळे हे राज्य अंधारात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे.. महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील 13 राज्यांवर विजेचे संकट आलं आहे..


सार्वजनिक क्षेत्रातील ‘पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (POSOCO) वीजपुरवठा करणाऱ्या ‘इंडिया एनर्जी एक्सचेंज, ‘पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया’ व ‘हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज’ या कंपन्यांना 5000 कोटींहून अधिक वीजबिल थकित असलेल्या 13 राज्यांनावीजपुरवठा करु नका, असा आदेश दिला आहे.महाराष्ट्र अंधारात बुडणार…?


केंद्रीय वीज मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘पोसोको’ कंपनीच्या आदेशामुळे 13 राज्यांना वीज खरेदी करता येणार नाही. त्यात महाराष्ट्रासह तमिळनाडू, जम्मू व काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, बिहार, छत्तीसगड व झारखंड या राज्यांचा समावेश आहे.महाराष्ट्रासह या 13 राज्यांकडे 5000 कोटींहून अधिकची रक्कम थकित आहे. त्यामुळे या राज्यांना केला जाणारा वीज पुरवठा बंद करावा.. जोपर्यंत या राज्यांकडून थकित वीजबिल भरलं जात नाही, तोपर्यंत त्यांचा वीजपुरवठा सुरू करु नये, असे आदेश ‘पोसोको’ कंपनीने दिले आहेत.


विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या 13 राज्यांना मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा जाणवत आहे.. त्यात ‘पोसोको’च्या या नव्या आदेशामुळे या राज्यांमधील वीजसंकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह या 13 राज्यांतील वीज गायब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे..वीज पुन्हा महागणार..?


दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये महावितरणकडून विजेच्या दरात प्रति युनिट 25 पैशांची वाढ केली होती. ‘इंधन समायोजन आकार’ म्हणजेच ‘एफएसी’ (FAC) मध्ये प्रचंड वाढ झाल्याने ही दरवाढ केल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ‘एफएसी’मध्ये वाढ होणार असून, त्यामुळे विजेच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचे समजते..कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारात महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. मात्र, त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार असून, विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार असल्याचे दिसत आहे..

Post a Comment

0 Comments