google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरी करणा-या आरोपींना जेरबंद चोरांविरुध्द धडक कारवाई

Breaking News

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरी करणा-या आरोपींना जेरबंद चोरांविरुध्द धडक कारवाई

 पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरी करणा-या आरोपींना जेरबंद चोरांविरुध्द धडक कारवाई 

पंंढरपूर:-पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३५० / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हे सिमकार्ड चोरीस गेलेबाबत तकार प्राप्त झालेने मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव, 


उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. विक्रम कदम, व श्री. अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी. व्ही. केंद्रे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास सुरू केला. सायबर शाखा सोलापुर ग्रामीण यांचेकडुन तांत्रिक तपासाचे आधारे प्राप्त माहीतीनुसार चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेटमध्ये इसम वाढेगाव ता. सांगोला जि.सोलापुर हा त्यांचे नावे असलेले जिओ कंपनीचे सिमकार्ड नंबर हे टाकुन वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली.


गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी मौजे वाढेगाव ता. सांगोला या ठिकाणी जावुन इसम नामे सिताराम दामोदर जाधव याचेकडे चौकशी केली असता, त्याने हा चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल ०१ महिन्यापुर्वी एका इसमाकडुन विकत घेतला असलेचे सांगीतले ने नमुद साक्षीदार याचेकडुन चोरीस गेलेला मोबाईल हँडसेट जप्त केला. 


व त्यानंतर मौजे पारे ता. सांगोला या ठिकाणी जावुन आरोपी इसम यास तपासकामी ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुशंगाने साक्षीदार व आरोपीस समोरासमोर घेवुन तपास केला असता आरोपी इसम हा मोबाईल चोरीतील सराईत गुन्हेगार असलेचे निष्पन्न झालेने त्यास तपासकामी अटक करून सदर गुन्हयाचा पुढील तपास केला असता सदर आरोपीतांकडुन वेगवेगळया कंपनीचे एकुण ३,८९,०००/- रू किंमतीचे ५० मोबाईल हस्तगत करून ते गुन्हयाचे तपासकामी जप्त करणेत आलेले आहेत.


सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. विक्रम कदम, व श्री. अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी. व्ही केंद्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ सुरज हेंबाडे, शरद कदम, बिपीन ढेरे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनिल बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंबाडे, सुजितजाधव, पोका समाधान माने तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोका अन्वर आतार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments