google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईची मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली हत्या!

Breaking News

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईची मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली हत्या!

 प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईची मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली हत्या!

अहेरी : अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात आज शुक्रवारी प्रियकराच्या मदतीने मुलीने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले. निर्मला (४९) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी उर्मिला आणि रूपेशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री पोलीस अधिकारी, उर्मिलाचे वडील चंद्रकांत पोलिस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर उर्मिलाचे पालनपोषण तिच्या आईने केलं. परंतु, उर्मिला आणि रूपेश यांचे प्रेमसंबंध तिच्या आईला मान्य नव्हते. तिने उर्मिलाला याबद्दल अनेकदा खडसावले आणि विरोध केला. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या आईची हत्या उर्मिलाने प्रियकर रूपेशच्या मदतीने केली.


दरम्यान, कर्मचारी गस्त घालत असताना आरोपी ऊर्मिला व तिचा प्रियकर रूपेश रस्त्याने येजा करताना दिसले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी उर्मिला व रूपेशला उर्मिलाच्या घरी नेले. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता उर्मिलाची आई निर्मला मृतावस्थेत आढळून आली.त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला.

Post a Comment

0 Comments