google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बापरे ! ग्रामस्थांच्या तावडीतून पळताना चोराने विहिरीत उडी मारून जीव गमावला ; 18 तासानंतर मृतदेह काढला

Breaking News

बापरे ! ग्रामस्थांच्या तावडीतून पळताना चोराने विहिरीत उडी मारून जीव गमावला ; 18 तासानंतर मृतदेह काढला

 बापरे ! ग्रामस्थांच्या तावडीतून पळताना चोराने विहिरीत उडी मारून जीव गमावला ; 18 तासानंतर मृतदेह काढला

अक्कलकोट : गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करताना ग्रामस्थांच्या पाटलागीत पळून जाताना चोराने विहिरीत उडी मारली होती. 18 तासाच्या प्रदीर्घ शर्यतीनंतर विहिरीतील चोरट्याचा मृतदेह काढण्यास पोलीस प्रशासन व  ग्रामस्थाना यश आले.अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला. 


गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांच्या घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कमेसह दागिने घेऊन बाहेर चोर जात असताना गावातील युवक कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली. तात्काळ गावातील काही युवकांनी चोराचा पाठलाग सुरू केला. चोर हा युवक कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटावयासाठी दिसेल त्या  मार्गाने तो पळू लागला या पळापळीत चोरट्याने रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीतच उडी मारली.


तात्काळ गावातील युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला.  तोपर्यंत चोरट्याचा त्या विहिरीतच जीव गेला . ही घटना कळताच अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे,  पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकडे,  उपनिरीक्षक प्रवीण लोकरे,  पोलीस नाईक मल्लिकार्जुन गोटे, पांढरे आदींनी घटनास्थळी दाखल झाले.


दरम्यान गावातील युवक कार्यकर्ते व  ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर मदत कार्याला सुरुवात झाली. विहिरीतील मृतदेह काढण्यासाठी जीवरक्षकांना बोलवण्यात आले. दोन मोटारीच्या सहाय्याने विहिरीतील पाणी काढण्यात आले, त्यानंतर जीवरक्षकाना बोलवण्यात आले. जीवरक्षक मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे,  महेश रेवणे व इतर सहकारी ग्रामस्थ पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर 18 तासाच्या प्रदीर्घ शर्यतीनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.


दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. विहिरीजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.. दिवसभर गावकरी ठाण मांडून होते. पोलीस प्रशासनाला मदतीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसून होता. दिवसभरात पोलीस प्रशासनाच्या मदतीला गावचे पोलीस पाटील, माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments