दुःखद ! सोलापुरात पोलीस हवालदाराचा वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू
सोलापूर,(प्रतिनिधी):- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदार अशोक लोखंडे (वय 50) यांचे शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी अकस्मिक निधन झाले.
अशोक नागनाथ लोखंडे हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार अशा पदावर कर्तव्य बजावले होते. सध्या आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते. गुरूवार दि. 18 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता त्यामुळे त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्या शुभेच्छाला उत्तर देत आणि आभार मानत ते आणि त्यांचे कुटुंब आनंदात असतानाच शुक्रवारची सकाळ त्यांच्यासाठी दुर्देवी ठरली.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांना छातीत दुखु लागल्याने उपचारासाठी तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अवघ्या काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून लोखंडे परिवाराचे सात्वन केले.
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी लोखंडे कुटुंबावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. पोलीस हवालदार अशोक लोखंडे यांनी अनेक चांगल्या कामगिरी पूर्ण केल्या होत्या त्यामुळे त्यांना पुरस्कार, बक्षिसही मिळाले होते. तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून त्यांचा सत्कारही झाला होता. अशोक प्रत्येकाला भेटल्यानंतर आनंदाने हसत बोलायचे त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला असून पोलीस आयुक्तालयात ही घटना समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.


0 Comments