google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ठरलं!! मंत्रिमंडळ विस्तार उद्याच; राजभवणार शपथविधी होण्याची शक्यता

Breaking News

ठरलं!! मंत्रिमंडळ विस्तार उद्याच; राजभवणार शपथविधी होण्याची शक्यता

 ठरलं!! मंत्रिमंडळ विस्तार उद्याच; राजभवणार शपथविधी होण्याची शक्यता 

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर हा शपथविधी पार पडेल. यावेळी शिंदे गट आणि भाजपचे मिळू 10 ते 15 मंत्री शपथ घेतील अशी देखील माहिती आहे.


शिंदे फडणवीस यांनी सत्तास्थापन करून 1 महिना उलटला, मात्र तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. विरोधकांनीही यावरून सरकारला धारेवर धरले होते . एकीकडे राज्यात पूरस्थिती, शेतीचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न असताना मंत्रिमंडळच नसल्याने सरकारवर टीकेची झोड उठली होती. अखेर उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.


उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात असून त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार लांबला असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत सरकारवर निशाणा साधला होता. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन चर्चा केली आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही नेते आजच राज्यपालांना भेटतील अशीही माहिती मिळत आहे.

Post a Comment

0 Comments