सांगोला तालुक्यातील घटना... त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सांगोला : लग्नात मानपान केला नाही व माहेरून पैसे घेऊन येत नसल्याने पती व सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय विवाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केली . महालक्ष्मी उर्फ गीता प्रसाद महादार ( वय ३४ , रा . कोष्टी गल्ली , सांगोला ) असे मृत विवाहितेचे नाव असून रविवार , ७ ऑगस्ट रोजीसकाळी ८ च्या सुमारास सांगोल्यात कोष्टी गल्ली येथे ही घटना घडली .
याप्रकरणी राजगोपाल भालचंद्र आवळकर ( रा . जवाहर नगर , इचलकरंजी , ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर ) यांनी फिर्याद दिली आहे . पोलिसांनी पती प्रसाद हरिबा महादार व मीनाबाई हरिबा महादार ( दोघेही रा . कोष्टीगल्ली) या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .


0 Comments