google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलिस ठाण्यातील डीबी पथक बरखास्त

Breaking News

सांगोला पोलिस ठाण्यातील डीबी पथक बरखास्त

 सांगोला पोलिस ठाण्यातील डीबी पथक बरखास्त


सांगोला पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक खून वाहन चोरी अशा विविध गुन्ह्यांचा तपास होत नसल्याने पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी डीबीचे पथक बरखास्त केले आणि पथकातील पोलिस कर्मचान्यांची बीट अंमलदार म्हणून नेमणूक केली आहे . त्यामुळे एरवी साध्या वेश्यात डीबीचे पोलिस म्हणून रूबाबात फिरणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांचा तोरा उतरला आहे . 


पोलिस कर्मचार्यांवर डीबी पथकाची धुरा सोपविणार आहेत . सांगोला शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख ५० हजार आहे . या मोठ्या असलेल्या १०३ गावांसाठी एकच पोलिस स्टेशन कार्यरत आहे . त्यासाठी १ पोलिस निरीक्षक , ५. सहायक पोलिस निरीक्षक , ३- पोलिस उपनिरीक्षक , ७ सहायक पोलिस फौजदार , १४२ ९ पोलिस नाईक , ३३- पोलिस कॉन्स्टेबल - चालक कॉन्स्टेबल कर्तव्यावर आहेत . 


पोलिस त्यापैकी ९ पोलिस कर्मचारी संलब्र  असून दोन वैद्यकीय रजेवर , तर चार किरकोळ रजेवर आहेत . सांगोला पोलिस स्टेशन अंकित कटफळ , नाझरे , कोळा , घेरडी असे चार और पोस्ट एखतपूर गाव शहर कार्यरत आहेत . लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत . त्यातच सांगोल्यातून राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग गेल्यामुळे साहजिकच अपघातांचे प्रमाण वाढले आहे . 


सांगोला पोलिस स्टेशनला दैनंदिन दाखल होणारे विविध गुन्हे घरफोडया वाहन चोरी , फसवणूक आदी गुन्ह्यांची लवकरात लवकर दखल व्हावी म्हणून पोलिस स्टेशन अंतर्गतच्या पथकाची नियुक्ती केली जाते . दरम्यान , सांगोला पोलिस स्टेशनला होणाऱ्या प्रलंबित गुन्ह्यांची दखल-पोलिस हेडकॉन्स्टेबल ,( तपास ) होत नसल्यामुळे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी डीवी पथक बरखास्त केले .


 पथकातील पोलिस कर्मचान्यांची औट पोस्ट हदीत बीट अंमलदार म्हणून नेमणूक केली आहे . त्यामुळे एरवी साध्या वेशात डीबीचे पोलिस म्हणून स्वात मिरवणाऱ्या त्या पोलिसांचा चांगलाच तोरा उतरला आहे . दरम्यान , पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगोला पोलिस स्टेशनला भेट देऊन दप्तर तपासणी केली . पोलिसांच्याअडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले .


 त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता , पत्रकारांनी तालुक्यातील बाळू चोरी , घरफोडी , विविध गुन्ह्यांचा तपासत नसल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या . पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस निरीक्षक यांना प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने करण्याच्या सूचना केल्या होत्या . याची गंभीर दखल घेऊन पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तातडीने डीबीचे पथकान पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत .

Post a Comment

0 Comments