google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एसटीचा प्रवास होणार आरामदायी, प्रवाशांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय…

Breaking News

एसटीचा प्रवास होणार आरामदायी, प्रवाशांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय…

 एसटीचा प्रवास होणार आरामदायी, प्रवाशांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय…

गेल्या काही दिवसांपासून एसटीचे चाक खोलात रुतले आहे.. कोरोनामुळे अनेक दिवस एसटी बंद होती. त्यानंतर विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 6 महिने आंदोलन केले.. त्यामुळे एसटीच्या तोट्यात आणखीच भर पडली.. त्यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.. एसटीचा प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, राज्यात पुन्हा एकदा एससी स्लीपर बससेवा सुरु करण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. गेल्या काही दिवसांत या क्षेत्रात खासगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी वाढली असून, ती मोडीत काढण्यासाठी महामंडळाने कंबर कसली आहे..

शिवशाहीला अल्प प्रतिसाद


खरं तर राज्य परिवहन मंडळाने यापूर्वी 22 जानेवारी 2018 रोजी एससी स्लीपर शिवशाही बससेवा सुरु केली होती. मुंबई मध्यवर्ती बसस्थानकातून ही बससेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, बसचा तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली. नंतर महामंडळाने 9 फेब्रुवारी 2019 रोजी तिकिट दरात कपातही केली. परंतु प्रवाशांनी बसला प्रतिसाद दिला नाही. परिणामी महामंडळाने ही बससेवा बंद केली.


प्रवाशांसाठी नंतर महामंडळाने नोव्हेंबर 2019 मध्ये एकाच बसमध्ये स्लीपर व आसन सुविधा असलेली साधी बस आली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या अशा 216 बस असून, प्रवाशांचा त्याला थोडा-फार प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अधिकाधिक प्रवाशी खेचण्यासाठी महामंडळाने आता एससी स्लीपर बस पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे..


खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळ लांब पल्ल्याची एसी स्लीपर बस सुरु करण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने महामंडळाने चाचपणी सुरु केली आहे. हैदराबाद येथे आयोजित देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला नुकतीच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.


प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या आरामदायी स्लीपर एसी बसही होत्या. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्लीपर असलेली साडेतेरा मीटर लांबीच्या बसची पाहणी केली.. त्यामुळे पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात एसी स्लीपर बसचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे..

Post a Comment

0 Comments