google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जय हो मोदीजी…! शेतकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, लाखो शेतकऱ्यांना होणारा फायदा

Breaking News

जय हो मोदीजी…! शेतकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, लाखो शेतकऱ्यांना होणारा फायदा

 जय हो मोदीजी…! शेतकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, लाखो शेतकऱ्यांना होणारा फायदा

 मित्रांनो खरे पाहता, देशातील शेतकऱ्यांच्या  कल्याणासाठी भारत सरकार तसेच विविध राज्यातील राज्य सरकार आपल्या स्तरावर वेगवेगळ्या योजना  कार्यान्वित करत असतात. तसेच शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत असतात. 


या योजनेच्या माध्यमातून तसेच निर्णयाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी सोईचे व्हावे तसेच त्यांचे जीवनमान उंचावले जावे हा मुख्य उद्देश असतो. अशा परिस्थितीत 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने  देखील शेतकरी हिताच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. 


आता, देखील मोदी सरकारने शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा निर्णय पारित केल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय पारित केला आहे. 


मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत शेती कर्जावर  दीड टक्के व्याजावर सवलत दिली जाणार आहे. यामुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 


नवीन अर्ज चालु झाले

यामुळे निश्चितच देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत मंजूर करण्यात आली आहे.


तसेच, क्रेडिट गॅरंटी 4.5 लाख कोटी रुपयांवरून 5 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी खतांवर 2 लाख कोटी रुपयांची सबसिडी असणार आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे.

Post a Comment

0 Comments