म्हसवड : माण तालुक्यातील पळशी येथे कोळसा व्यापाऱ्याचा खून
म्हसवड तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर कातकरी समाजातील कोळसा जाधव या परप्रांतीय व्यापाऱ्याचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली . कातकरी समाजातील दोन ते तीन कुटुंब व्यवसायानिमित्त वास्तव्यास होती . त्यांच्यात अंतर्गत वादाचे मारहाणीत रुपांतर होऊन कुशा चंदर जाधव नामक व्यक्तीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला .
ही घटना शनिवार दि . 20 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे . सदर मयत व्यक्तीचा खुन करुन क्रूरपणे जीभ तोडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे . हल्लेखोर तेथून पसार झाला आहे . अधिकचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत .


0 Comments