आता भाजपचे टार्गेट नितीन गडकरी ? एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात…
विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात आहे. आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होतो की काय? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
“सध्या भाजपमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे. एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो.”, अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज (शनिवार) नागपुरात व्यक्त केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी तंत्रज्ञान यात्रेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी कन्हैय्या कुमार नागपुरात आले असता ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
“युवा है जोश में लायेंगे इन्हे होश में” या घोषवाक्यासह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातूनदेशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई हे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत, हे सर्व थांबवायचं असेल, तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले.
गडकरींच्या विरोधातही सीबीआयचा वापर केंद्रीय एजन्सीचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात आहे. आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होतो की काय? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.


0 Comments