Breaking News

‘अशी’ गाडी चालवल्यास 5000 रुपये दंड होणार , सरकारचा मोठा निर्णय…!!

 ‘अशी’ गाडी चालवल्यास 5000 रुपये दंड होणार , सरकारचा मोठा निर्णय…!!

इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. पेट्रोलचा थेंब ना थेंब वाचण्यासाठी अनेक जण वेगवेगळे फंडे वापरतात.. बरेच जण उतारावरुन गाडी जात असल्यास, गाडी बंद करतात किंवा न्यूट्रलमध्ये गाडी चालवत असतात.. मात्र, आता असा प्रकार केल्यास, तो अंगलट येऊ शकतो..


उतारावर ‘न्यूट्रल’वर गाडी चालवताना, बरेचदा चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. असा प्रकार वाहनचालकासह समोरुन येणाऱ्या वाहनांसाठीही धोकेदायक ठरु शकतो.. विशेषत: घाटातील उतारावर असे प्रकार जिवावर बेतू शकतात.. अशा प्रकारे होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे..


इंधन बचत करण्याच्या उद्देशाने घाटातील उतारावरुन न्यूट्रल गिअरमध्ये (Neutral Gear) गाडी चालवणाऱ्या चालकांना आता 5 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.. केंद्रीय रस्ते मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय, याबाबत नियमावलीच जाहीर केली आहे.. ती खालीलप्रमाणे :


घाटातील उतारावर वाहने न्यूट्रल गिअरमध्ये किंवा बंद करुन चालवल्यास आता दंडात्मक कारवाई केली जाणार.

दुचाकी व तीन चाकी वाहनांना पहिल्या वेळेस 1000 रुपये दंड व तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो.

दुसऱ्यांदा हाच गुन्हा करताना आढळल्यास 3000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.


चारचाकी किंवा त्यापेक्षा अधिक जड अवजड वाहनांनी घाटातून प्रवास करताना हा नियम मोडल्यास, पहिल्या वेळेस 2000 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द, तसेच दुसऱ्या वेळेस हाच गुन्हा केल्यास 5000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

कशामुळे घेतला निर्णय..?

गाडी अचानक ‘न्यूट्रल’ केल्यास वाहनाचं इंजिन व चाकं डिस्कनेक्ट होतात. घाटातील बहुतांश अपघात हे न्यूट्रल गिअरमध्ये वाहन चालवल्याने किंवा गाडी बंद करुन चालवल्याने झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी नवीन मोटार वाहन कायदा डिसेंबर 2021 मध्ये लागू करण्यात आला आहे. आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments