google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आ . प्रणिती शिंदे यांची आ . शहाजीबापू पाटील यांच्यावर नाव न घेता टीका ' काय झाडी , काय डोंगार ' वाल्यांचे ओक्के असेल ; पण जनता ‘ नॉट ओके ' आहे !

Breaking News

आ . प्रणिती शिंदे यांची आ . शहाजीबापू पाटील यांच्यावर नाव न घेता टीका ' काय झाडी , काय डोंगार ' वाल्यांचे ओक्के असेल ; पण जनता ‘ नॉट ओके ' आहे !

 आ . प्रणिती शिंदे यांची आ . शहाजीबापू पाटील यांच्यावर नाव न घेता टीका ' काय झाडी , काय डोंगार ' वाल्यांचे ओक्के असेल ; पण जनता ‘ नॉट ओके ' आहे !

प्रतिनिधी / सोलापूर राज्याला स्थिर सरकार मिळाले , तर महागाई कमी होईल . अशी आशा वाटते . कारण , केंद्राकडून महागाई कमी होताना दिसत नाही . आज सिलिडरचा दर ११०० रुपये झाला आहे . दोन वेळचे जेवण बनवणेही कठीण झाले आहे . तरीही कोरोनानंतर आलेल्या निर्बंधमुक्त नागपंचमीच्या सणामुळे आज सर्व आनंदित आहेत . आज सरकार बदलून ३५ दिवस झाले .


 तरीही फक्त दोघांवरच सरकार चाललंय . काय ते झाडी , काय ते डोंगार , असे त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचं ' नॉट ओक आहे , असा टोलाही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार शहाजी पाटील यांना नाव न घेता लगावला . " आमदार शिदे या नागपंचमीच्या निमित्ताने सोलापुरात आल्या होत्या . त्या वेळी माध्यमांशी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली . 


प्रणिती शिदे यांनी या वेळी सोनिया गांधी , राहुल गांधी , संजय राऊत यांच्या ईडीच्या चौकशीवरून भाजपला लक्षय केले . त्या म्हणाल्या की , खूप खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे . जे प्रकरण २०१५ मध्ये बंद झालंय , ते आज पुन्हा काढून सोनिया गांधींना त्रास दिला जातोय . केवळ हम बोले सो कायदा दाखवण्याचे काम सुरू आहे . सोनिया गांधी या देशाच्या एवढ्या वरिष्ठ नेत्या , 


एका मोठ्या पक्षाच्या प्रमुख असून त्यांना दहा - दहा वेळा ईडीकडून चौकशीला बोलवले जाते . राहुल गांधी यांना बोलावून घेताय . सहा - सहा तास चौकशीला बसवताय आणि एकच तास चौकशी करताय , तीही व्यर्थ . ही कसली पद्धत , असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी केला . आमदार शिदे म्हणाल्या की , पार्लमेंटमध्ये भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या हमरी तुमरीची भाषा करतायत .


 भाजपची खालच्या पातळीला जाऊन अॅटॅक करण्याची जी संस्कृती आहे ,ती दिसून येत आहे . मात्र , स्मृती इराणींचे सिलिसोलचे प्रकरण काय आहे , ते तुम्हाला माहिती आहे . इंस्टाग्रामवर त्यांची पोस्ट डिलीट करतात , त्यामुळे मला असे वाटते की काचेच्या घरात राहणाऱयांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेकू नये . मात्र , भाजपची तशी संस्कृतीच नाही , त्यांच्या लोकांची ही नाही . महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्यावर कोणीही काहीही बोलत नाही .


 महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मराठी माणसाचे योगदान असताना राज्यपाल भगतसिह कोशयारी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात . ईडीची भीती दाखवून आमच्या नेत्यांना छळत आहेत . मात्र , मूळ मुद्दे सोडून महागाईचा चटका ज्यांना बसतो , त्यावर कोणी बोलत ना ही . भाजप आणि मोदींकडून चुकीच्या पद्धतीने लोकशाहीची हत्या करताना पाहायला मिळतेय , असा आरोपही प्रणिती शिदे यांनी केला . नागपंचमी हा आपला सण आहे . 


घरोघरी पुरण पोळी करतात , नागोबाची पूजा करतात . जागोजागी महिला झोका बांधून खेळ खेळतात . पण , महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे , त्यामुळे कुठेतरी त्याची खंत वाटते . आज पुरणपोळी बनवताना दहादा विचार करावा लागतो . कारण , सर्वांवर महागाईचा डोंगर कोसळला आहे . सर्व किराणा वस्तू महाग झाल्या आहेत , त्यामुळे दहा वेळा विचार करावा लागतो की आज पुरणपोळी कशी बनवायची , असा प्रश्न आमदार प्रणिती शिदे यांनी उपस्थित केला .


 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी . नड्डा म्हणाले की देशात फक्त भाजपच राहणार . बाकी सर्व प्रादेशिक पक्ष आम्ही संपवणार आहोत . काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित श हा देखील म्हणाले होते की शिवसेना को हमे जडसे खतम करना है . आज त्यांचा छलकपट , कट होताना दिसत आहे , अशा शब्दांत शिदे यांनी नड्डा आणि शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले .

Post a Comment

0 Comments