google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एटीम मशीन फोडणाऱ्या दोघांना अटक

Breaking News

एटीम मशीन फोडणाऱ्या दोघांना अटक

 एटीम मशीन फोडणाऱ्या दोघांना अटक

मोहोळ : एटीम फोडून पोलिसांना आव्हान देणाऱ्या दोघांना मोहोळ पोलिसांनी गजाआड केले असून मोहोळ पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे.

मोहोळ - कुरूल रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) एटीएम वर चोरट्यांचा डोळा होता आणि दगड घालून हे एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न २९ जुलै रोजी झाला होता. चोरट्यांचा हा पहिला प्रयत्न नव्हता तर भर चौकात असलेले हेच एटीम मशीन फोडण्याचा चोरांनी यापूर्वीही दोन वेळा प्रयत्न केला होता. एकच एटीम मशीन तीन वेळा फोडण्याचा प्रयत्न झाल्याने मोहोळ पोलिसांपुढे देखील या चोरांनी एक आव्हान उभे केले होते.

 चोरट्यांनी पहिल्या वेळेस यातील रक्कम देखील लंपास केली होती परंतु पोलिसांना या चोरांचा शोध लागत नव्हता त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात होते. पोलीस या चोरांच्या मागावर होते परंतु त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता त्यामुळे त्यांना पकडणे हे एक आव्हान बनले होते. 


तीन वेळा एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न होऊनही पोलिसांना धागेदोरे लागत नसल्यामुळे पोलिसांवर टीका होऊ लागली होती.  सदर आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी पथके तयार करून शोध सुरु केला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांचा देखील या पथकात समावेश करण्यात आला होता.

 हे पथक आरोपींचा शोध घेत इंदापूर तालुक्यांपर्यंत देखील गेले होते, विविध ठिकाणी या आरोपींचा शोध पोलीस घेत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने देखील हा तपास केला जात होता. पोलिसांचा हा प्रयत्न सुरु असतानाच मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील दोन इसम संशयीतासारखे दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा मोर्चा सौंदणे येथील दोन संशयीताकडे वळला. 


पोलिसांच्या पथकाने याची कुठेही उकल न करता आणि कुणालाही चाहूल लागू न देता थेट त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना आपल्या ताब्यात घेतले. पांडुरंग शिवाजी डूणे आणी गणेश सुरेश अनुभूले (दोघेही राहणार सौंदणे, ता. मोहोळ) या दोघांना मोठ्या कौशल्याने ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस सुरु केली. 


 सुरुवातीला त्यांनी पोलिसांना कसलाच थांगपत्ता लागू दिला नाही. आपला काहीच संबंध  नाही असे दाखविण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. एटीम फोडणारे आरोपी हेच आहेत याची खात्री पोलिसांना होत होती पण संशयित आरोपी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवायला सुरुवात केली आणि दोघेही पोपटासारखे बोलू लागले.

सदर दोन्ही संशयित आरोपींनी पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली.  या दोन संशयित आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दोघांना अटक करून अधिक तपास मोहोळ पोलिसांनी सुरु केला आहे. बहुचर्चित ठरलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांचे कौतुक होऊ लागले आहे.

Post a Comment

0 Comments