सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण ; 19 हरकती ; पहा कुणी घेतली हरकत ; झेडपी-पंचायत समितीत दिव्यांगासाठी आरक्षण ठेवा
सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे गट, गणाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ११ तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदार संघावर हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. सात तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या गणावर १९ तर सहा तालुक्यांत पंचायत समितीच्या १० जागांवर सूचना व हरकती आल्या आहेत. पडताळणी करून दि. ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण यादी जाहीर होणार आहे. या हरकती मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिव्यांगांना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ७७ जिल्हा परिषदेचे गट व १५४ पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण दि.२८ जुलै रोजी काढण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे आरक्षण सोलापुरातील नियोजन भवनात तर पंचायत समित्यांचे आरक्षण संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयात काढण्यात आले. आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर त्यावर दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान निवडणूक आयोगाच्यावतीने सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या ११ पैकी ७ तालुक्यात सूचना व हरकती मांडण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या गटात करमाळा तालुक्यात ०२, मोहोळ तालुक्यात ०२, पंढरपूर ०१, सांगोला ०३, मंगळवेढा ०२, दक्षिण सोलापूर ०४, अक्कलकोट ०३, सर्वसाधारण हरकत ०३ अशा एकूण १९ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. पंचायत समित्यांच्या १५४ गणांसाठी करमाळा तालुक्यात ०६, माढा ०१, उत्तर सोलापूर ०१, मोहोळ ०२, पंढरपूर ०२, सांगोला ०३, मंगळवेढा ०४, दक्षिण सोलापूर ०५, अक्कलकोट ०२ अशा एकूण २९ सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत... दरम्यान कुणी घेतल्या कोणत्या गटांवर हरकती पहा...
0 Comments