google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक : चक्क पोलिसांनी पळवला गुटख्याचा ट्रक, पहा काय आहे प्रकरण.

Breaking News

धक्कादायक : चक्क पोलिसांनी पळवला गुटख्याचा ट्रक, पहा काय आहे प्रकरण.

 धक्कादायक : चक्क पोलिसांनी पळवला गुटख्याचा ट्रक, पहा काय आहे प्रकरण. 

आपण आजपर्यंत चोर चोरी करतात, दहशत दहशतवादी पसरवतात, तसेच लष्कर देशाचे संरक्षण करतात आणि पोलीस खाते गुन्हेगारापासून किंवा बेकायदेशीर धंद्यांना आळा घालतात. पण या बातमीत एक वेगळीच घटना घडली आहे. बीडमध्ये अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला आहे. चक्क काही पोलिसांनी गुटख्याचा ट्रक पळवला.


बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलिसांना गुटख्याचा कंटेनर अडवण्यासाठी पाठवलं होतं, मात्र या पोलिसांनी तो कंटेनर अडवल्यानंतर त्यातील 50 पोते ऐवजी कारवाईत केवळ 27 दाखवले आणि 23 पोते गुटका पाटोदा शहरातील एका कंट्रक्शन कार्यालयात प्रसार केला. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर, पोलीस कर्मचारी संतोष शिरसागर आणि कृष्णा डोके यांना निलंबित केला. त्यांचा निलंबनाचा आदेश येतात हे आरोप ठेवण्यात आले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.


आरोपिंना पकडून त्यांच्यावरती कारवाई करायच्या ऐवजी या ठिकाणी पोलीस कर्मचारी गुन्हेगार बनलेत ज्या ठिकाणी गुटख्याच्या कारवाईला गुटखा जप्त करायचा, त्या ठिकाणी या पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी गुटका जप्त करून एका कार्यालयात ठेवला दरम्यान बीड जिल्ह्याच्या मागच्या काही दिवसांमध्ये पंकज कुमावत यांचे पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यांवरती लक्ष केंद्र केलं होतं, मात्र अनेक ठिकाणी गुटखा व्यापाऱ्यांना पोलिसांचे अभय असल्याचे दिसते. याचा प्रत्यय बीडच्या पाटोदा येथील कारवाईत समोर आला.

वाळू नंतर आता काही पोलीस असे आहेत असे देखील दिसते. त्यामुळे अशा पोलिसांवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्व सामान्य नागरिक करत आहेत. आणि पोलिसांनी मात्र आपलं काम करावं गुन्हेगारांना पकडणं पकडता स्वतःही गुन्हेगार होऊ नये अशा खोचक सूचना आता सामान्य माणसं हे पोलिसांना देता येते.

Post a Comment

0 Comments