Breaking News

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार, खासदार कमी आसले तरी शेकापक्षाची पत मात्र कमी नाही

 शेतकरी कामगार पक्षाचे आमदार, खासदार कमी आसले तरी शेकापक्षाची पत मात्र कमी नाही

   सध्या राजकारणामध्ये अनेक पक्ष काम करीत आहेत. काही पक्षाचे आमदार, खासदार व ईतर लोकप्रतिनिधी संख्येने‌‌ जास्त आहेत परंतु आसे कितीतरी पक्ष आहेत त्यांच्याकडे लोकप्रतिनिधींची संख्या शेकापक्षाच्या तुलनेत जास्त प्रमाणात आसली तरीही शेकापक्षाकडील लोकप्रतिनिधी कडे असलेली विश्वासहर्ता, निष्ठा म्हणजे पत मात्र ईतर‌पक्षाकडे जास्त आहे.शेकापक्षाची निष्ठा मात्र सर्वात वरच्या स्थानी आहे....

   आहो कितीही प्रबळ पक्ष असले तरी त्यांच्या लोकप्रतिनिधीवरती पक्ष बदलु नये विचारधारेशी फारकत घेऊ नये म्हणून सतत नजर ठेवली जाते, वेगवेगळ्या माध्यमातुन दबाव टाकला जातो, अनेक प्रकारची आमिषे दाखवली जातात व त्यांना आपल्या बाजुने ठेवण्याचा खटाटोप केला जातो. 

   मात्र शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रतिनिधी हे कुठल्याही दबावाला व आमिषाला बळी पडत नाहीत.. किंवा सत्तेच्या मोहापाई विचारांशी फारकत घेत नाहीत.काही पक्ष हे छत्रपती शिवराय, शाहु, फुले व आंबेडकर यांचे नाव घेऊन मते मागतात, मोठाली भाषणे ठोकतात.. मात्र प्रत्यक्षात  राष्ट्रपुरुषांच्या विचारांशी फारकत घेत राजकारण करतात. शेतकरी कामगार पक्ष मात्र छत्रपती शिवरायांच्या शाहू फुले व आंबेडकरांच्या विचाराचा खडतर असणारा वारसा सक्षमपणे चालवताना दिसतात... 

  शेतकरी कामगार पक्षाचे रेकॉर्ड ब्रेक आमदार स्व भाई गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब  हे अकरा वेळा आमदार होते तरीही सत्तेपाई कदापिही विचारांशी तडजोड केली नाही. आपली आमदारकी ही जनतेने दिलेली आहे ती जनतेच्या कामी आली पाहीजे या साठी  त्यांनी आमदारकी पणाला लावली. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे आता नवीन सुत्र समोर येत आहे. परंतु  शेकापक्षाचे लोकप्रतिनिधी  मात्र याला अपवाद आहेत.

    आहो स्व आबासाहेब हे संपुर्ण भारत देशात सर्वाधिक काळ आमदार असुनही त्यांनी साधी रहाणी अंगिकारली  कदीही डामडौल केला नाही, राहण्यासाठी साध्या पध्दतीचे घर तेच टेबल, तीच खुर्ची, लोकांना बसण्यासाठीच्या त्याच खुर्च्या, गरम पाणी करण्यासाठी चूल व पत्र्याचा डबा,पिण्याच्या पाण्यासाठी डेरा तसेच रद्दी विकुन पैसे सरकारला जमा करणे, नगरपालिकेचे कर, लाईटबिले, फोन‌ची ‌बीले वेळच्यावेळी भरणे हे आहेत शेकापक्षाचे‌ आमदार तसेच  कुणालाही कामाच्या मोबदल्यात एका पैशाची मागणी न करणे आसे हे अकरा वेळा निवडुन आलेले शेकापक्षाचे आमदार स्व आबासाहेब....

   मग सांगा शेकापक्षाचे आमदार खासदार संख्येने जरी खालच्या स्थानी असले तरी त्यांची पत मात्र सर्वात वरच्या स्थानी आहे‌ आसे मत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments