मुख्यमंत्री शिंदे यांचा धडाकेबाज निर्णय महाविकास आघाडीला दणका
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचे आणि काही निर्णयांमध्ये थेट दुसरी भूमिका घेण्याचे काम शिंदे सरकारकडून सुरु आहे . आताही शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेतले .
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले सरकार कोसळणार , अशी शक्यता लक्षात घेऊन शेवटच्या आठवड्यात विशेषता शेवटच्या दोन दिवसात अनेक निर्णय घेतले , तसेच जीआर देखील काढले . परंतु त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या सरकारने राज्य कारभार हाती घेताच नवीन पद्धतीने कामकाज सरु केलेत्यामुळे आता पूर्वीच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात येत आहेत .
मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच शिंदे यांनी आरे मधील कारशेड प्रश्न असो की अन्य काही प्रश्न याबाबत फेरविचार केला . आता पुन्हा सुमारे 5 हजार कोटी रुपयांच्या निविदांना शिंदे यांनी स्थगिती दिली आहे . हजारो कोटींचे जीआर ठाकरे सरकारकडून एकापाठोपाठ एक काढलेल्या जीआरचा आकडा जवळपास सहा हजार कोटींच्या पुढे गेला होता .
मात्र आता शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ या काढलेल्या जीआरला ब्रेक लावायला सुरु केले . शिंदे सरकारने तब्बल 5020 कोटींच्या निविदांना स्थगिती दिली आहे . जी काम सुरू झाली नाहीत , त्या सर्व जीआरनास्थगिती देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे . त्यामुळे हां महाविकास आघाडी सरकारसाठी झटका मानला जात आहे .


0 Comments