Breaking News

ब्रेकिंग ! राज्यातील महानगरपालिका , नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलणार ?

 ब्रेकिंग ! राज्यातील महानगरपालिका , नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलणार ?

राज्यात जाहीर झालेल्या नगरपरिषदा , नगरपंचायती , महानगरपालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत . सध्या पाऊस आहे . पूर परिस्थिती निर्माण होत आहे , अशा स्थितीत सरकारी यंत्रणा निवडणूक कामात लावणी कठीण होईल . शिवाय शिवसेना भाजप युती सरकारची भूमिका ओबीसी आरक्षणास शिवाय निवडणूक नकोत ,

 अशी असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करू , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले . राजधानीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , भाजप अध्यक्ष जे . पी . नड्डा यांच्या भेटी घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते . ओबीसीआरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची देखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली


 आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात मांडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा केली . त्याचवेळी महाराष्ट्रात 92 नगरपरिषदा , महानगरपालिका , नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत , ही सरकारची भूमिका दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केली . पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणे अवघड आहे . 

अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा होऊ शकते . या पार्श्वभूमीवर निवडणुकांसाठी सरकारी यंत्रणा लावणे कठीण आहे .त्यामुळे तसेच ओबीसी आरक्षण पूर्ण लागू झाल्याशिवाय निवडणूक पुढे ढकलण्याची सूचना निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला करू , असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले .

Post a Comment

0 Comments