google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र विधानसभेचे स्मृतिपत्र आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते प्रदान..

Breaking News

स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र विधानसभेचे स्मृतिपत्र आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते प्रदान..

 स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र विधानसभेचे स्मृतिपत्र आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते प्रदान..

 सांगोला/ प्रतिनिधी काल दिनांक १६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख  यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र विधानसभे मध्ये केलेले  कार्य चिरकाल राहावे  व महाराष्ट्र विधानमंडळ यांनी त्यांना भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते यापूर्वीच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित  केले आहे

 व अनेक विविध संस्थाकडून ही त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्कार मिळालेले आहेत एकाच मतदारसंघांमध्ये सलग अकरा वेळा  प्रतिनिधित्व करून  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये  दोन वेळा  मंत्री म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत  महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष  नरहरी झिरवळ यांनी त्यांचे कार्य महाराष्ट्रातल्या  जनतेच्या  कायम   स्मरणात  राहील

 यासाठी त्यांच्या कुटुंबियांना  त्यांच्या कार्याचा उल्लेख करून स्मृतीपत्र दिले आहे काल सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार  शहाजी बापू पाटील  यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी  रतनबाई गणपतराव देशमुख  त्यांचे चिरंजीव  चंद्रकांत देशमुख  व नातू डॉ बाबासाहेब देशमुख यांच्याकडे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन स्मृतीपत्र  प्रदान करण्यात आले.

 यावेळी सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील, सांगोला नगरपरिषदेची माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यासह देशमुख कुटुंब उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments