सांगोला एस . टी . आगार समस्यांच्या विळख्यात प्रवेशद्वारावर पडले खड़े कचऱ्याचे ढिगारे , सांडपाण्याने प्रवासी त्रस्त
सांगोला एस.टी. बसस्थानकामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे . ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग , बसस्थानक परिसरामध्ये अनेक ठिकाणी पसरलेली दुर्गंधी , प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी साचलेले पाणी व सांडपाण्याचा प्रश्न हे सर्व काही प्रवाशांच्या आरोग्याला हानिकारक ठरणारे आहे . आगाराच्या प्रवेशद्वारासमोरच पडलेला खड्डा एस . टी . व इतर वाहनांसाठी धोकादायक ठरत असल्याने आगारप्रमुख यांच्या बेजबाबदारपणामुळे सांगोला एस . टी . आगार अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासीवर्गातून उमटत आहे .
· सोलापूर - कोल्हापूर - रत्नागिरी तसेच पंढरपूर - मिरजया महामार्गाच्या मध्यभागी आणि सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या सांगोला एस . टी . • आगारामध्ये दैनंदिन हजारो प्रवाशांची ये - जा सुरू असते . या आगारामध्ये एस . टी . प्रवेश करताच सर्वप्रथम भल्या मोठ्या खड्ड्याने प्रवाशांचे आणि एस . टी . चे स्वागत होते .
रात्री अपरात्री एस.टी. आगारामध्ये आल्यास अचानकपणे चालकाचा ताबा सुटल्यास रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या या खड्ड्यामध्ये एस . टी . जाऊन कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो , ही परिस्थिती नाकारता येत नाही . तरीदेखील आगारप्रमुखांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा खड्डा अपघाताला आमंत्रण देतो आहे . या खड्ड्यामध्येच गटारीचे पाणी तुंबून राहिले असल्याने सध्या या खड्ड्याच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे . सोलापूर जिल्ह्यातीलसर्वात स्वच्छ आणि सुसज्ज असे सांगोला एस . टी . आगार म्हणून प्रसिद्ध होते .
मात्र एस.टी. आगारप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे आता हेच सांगोला एस . टी . आगार अस्वच्छतेच्या आणि दुर्गंधीच्या बाबतीत जिल्ह्यात सर्वप्रथम असे सांगोला एस . टी . आगाराचे नाव पुढे येत आहे . एस . टी . आगार परिसरात एस . टी . ची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना नाकाला रुमाल लावून प्रतीक्षा करावी लागत आहे . यासंदर्भात एस . टी . आगारप्रमुख लक्ष देणार का , असाही सवाल या निमित्ताने प्रवासीवर्गातून उपस्थित होत आहे . एस . टी . आगार परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे .
परंतु या आगार परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी साचून राहिलेले पाणी हे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करीतआहे . पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता केली जात नाही . पाण्याच्या चावीखाली मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने पाण्याची सोय ' असून अडचण आणि नसून खोळंबा ' अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे . रात्री अपरात्री एस.टी.ची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना या पाण्यामुळे • डासांचा त्रास सहन करावा लागत आहे . यासह आगार परिसरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग उभा आहेत .
बसस्थानक परिसरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे . कोरोना नंतर एस . टी . ही पूर्वपदावर येत असताना आगार परिसरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवासीवर्गातून या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आगारप्रमुखांना या संदर्भात जाग येणार का , असाही सवाल उपस्थित केला जात आहे .


0 Comments