चाँदभैय्या शेख यांनी गुरुच्या गौरवाप्रित्यर्थ छत्रपती शिवाजी विद्यालयात जाऊन गुरूंचा केला सन्मान
सांगोला - प्रतिनिधी गुरु परमात्मा परमेशु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:। गुरुर्साक्षात परब्रम्हः तस्मैन श्री गुरुवे नमः॥
ब्रह्मा, विष्णू, आणि महेश्वर पेक्षा श्रेष्ठ व महान गुरुचे स्थानं आहे. ' गुरु अंधकार दूर करणारा” सत्याचा मार्ग दाखवणारा, दुष्प्रवृत्तीचा नाश करुन सत्प्रृत्तिकडे ज्ञान देणारा मार्गदर्शक आहे. आयुष्याला योग्यप्रकारे वळण देऊन उच्च उत्तम उदात्त उन्नत असे शिष्याचे व्यक्तीमत्व घडवित असतो .गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप. आषाढ शुद्ध पौर्णिमेला महामुनी व्यासाचा जन्म झाला. आपण गुरुच्या गौरवाप्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी करतो .याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रात पत्रकारिता करणारे निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांनी त्यांच्या जन्मगावी पारे तालुका सांगोला येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे या ठिकाणी जाऊन सर्व शिक्षकांना आदरपूर्वक सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगोला पंचायत समितीचे माजी सदस्य किसनराव गायकवाड यांनी स्विकारली होते .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रेश्मा शेख या उपस्थित होत्या .विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पुकळे ,सचिव मधुकर गोरड ,मोटे सर ,माळी सर ,कुलकर्णी सर ,गेजगे सर ,गायकवाड सर ,माने मँडम ,आठराबुद्देसर ,चव्हाण सर ,सांळुखे सर ,गौड सर यांच्या सह विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पारे गावचे नाव देशाभरात पोहचविणारे विचारववंत व निर्भीड पत्रकार सीबीएस न्युज मराठी चे मुख्य संपादक चाँदभैय्या शेख यांनी डिजिटल मिडिया ,वृत्तपत्र , सामाजिक , क्रीडा , राजकीय , कृषी , शैक्षणिक , वैद्यकीय , आर्थिक , गुन्हे विषयक सर्व बातम्यांचे निर्भीड लेखन करून असंख्य लोकांना न्याय देणारा माणूस म्हणजे चाँदभैय्या गेले १५ वर्षे विविध दैनिकात वार्ताहर म्हणून काम केल्यानंतर आता सीबीएस न्युज मराठी या डिजिटल नेटवर्क च्या माध्यमातून चाँदभैय्या यशस्वी पत्रकारिता करीत आहेत …
विशेषतः त्यांना आतापर्यंत विविध संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ८९ पुरस्कार मिळाले आहेत .याच १५ वर्षात असंख्य विषयांवर योग्य अचूक लिखान करून तालुक्यातील विविध प्रश्न त्यांनी सोडविले यातच त्यांचे सामाजिक कार्य दिसून येते.आपली पत्रकारिता सामाजिक जीवनाला सार्थक लाभावी हे अनेकांचे स्वप्न असते, काहीच लोक पूर्ण करतात काही करत नाहीत मात्र एक स्वप्न सत्यात पूर्ण करणारा माणूस म्हणजे चाँदभैय्या शेख होय .
पत्रकारिता करीत आतापर्यंत विविध सामाजिक कामे केले आहेत .यायच एक भाग म्हणून आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शिक्षकांचा सन्मान करणे आवश्यक असते हे लक्षात आल्याने चाँदभैय्या सर्व कामे बाजूला करुन शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता . जे अशक्य आहे ते शक्य करण्याचा नेहमीच ते प्रयन्त करतात ” म्हणूनच ते एक सामाजिक कार्यकर्ते या नावे सुद्धा ओळखले जातात.


0 Comments