नगरपालिकेने आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी स्वर्गीय आबासाहेबांच्या पुतळ्याचा ठराव करावा
मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांची निवेदनाद्वारे मागणी
सांगोला/शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी :
नगरपालिकेने आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी स्वर्गीय मा. आम. गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या पुतळ्याचा ठराव करावा. अशी मागणी मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे केली आहे.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील स. नं. 247/2ब/1अ/1अ/1/अ व 247/2ब/1अ/1अ/1ब सीटी सर्व्हे नं. 2928 याचे 7/12 प्रमाने क्षेत्र 66 आर प्रारूप द्वितीय सुधारित विकास योजनेत आ. क्र. 36 बगीचा असे आरक्षण पडले होते सदरच्या आरक्षित जागे संदर्भात 2013 ला जमिनीचे मालक दत्तात्रय वसंत देशपांडे व नगरपालिका यांच्यामध्ये 50% क्षेत्र नगरपालिकेला देण्याचा करार झाला होता. तशी शासनाकडून मंजुरी मिळाली होती परंतु नगरपालिकेने ते आरक्षित क्षेत्र अद्याप पर्यंत ताब्यात घेतलेले नाही. तरी ती आरक्षित जागा नगरपालिकेने त्वरित ताब्यात घेऊन त्या जागी बगीचा साठी आरक्षण असून त्या जागी स्व. मा. आम. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांचा पुतळा बसवण्याचा ठराव करून तो शासनाकडे त्वरित सादर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे केली आहे.
सदरच्या एकूण क्षेत्रातील 50 टक्के क्षेत्र नगर पालिकेस करार करून दिले आहे व उर्वरित 50 टक्के क्षेत्र हे शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत व स्वर्गीय मा. आम. गणपतराव देशमुख यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या नावावर आहे. तरी त्या कार्यकर्त्यांना आबासाहेबांमुळे आर्थिक, सामाजिक व राजकीय पदे उपभोगण्यास मिळालेली आहेत. तरी त्यांनी ती जागा मनाचे मोठे पण दाखवून आबासाहेबांच्या पुतळा व स्मारकासाठी द्यावी म्हणून आपण त्यांना विनंती करणार आहे व तशी चंद्रकांत दादा देशमुख, बाबासाहेब देशमुख व अनिकेत देशमुख यांनी ही त्यांच्या बरोबर चर्चा करून पुतळा, स्मारक भव्य दिव्य कसे होईल यांच्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण स्वर्गीय आबासाहेबांचा पुतळा मुख्य ठिकाणी उभा राहावा अशी तालुक्यातील तमाम बहुजन समाजाची इच्छा आहे.


0 Comments