google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व . गणपतराव देशमुख यांचे स्मारक सभागृह परीसरात उभे करावे- डॉ . बाबासाहेब देशमुख

Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व . गणपतराव देशमुख यांचे स्मारक सभागृह परीसरात उभे करावे- डॉ . बाबासाहेब देशमुख

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व . गणपतराव देशमुख यांचे स्मारक सभागृह परीसरात उभे करावे- डॉ . बाबासाहेब देशमुख

सांगोला ( प्रतिनिधी ) : सध्या राज्यामध्ये नवीन सरकार अस्तित्वात आले असून , त्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी सुत्रे हाती घेतली आहेत . ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असताना व देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना सभागृहामध्ये स्व . आबासाहेबांना अभिवादन करताना स्व . आबासाहेबांचा पुतळा स्मारकस्वरुपात विधानसभा सभागृह आवारात उभा करण्याची मागणी केली होती . सभागृहामध्ये ही या मागणीचे स्वागत झाले होते . 

कुठल्याही नेत्यांचे राष्ट्रपुरुषांचे स्मारक हे येणाऱ्या पिढीसाठी आदर्श व प्रेरणादायी आसते . स्व . आबासाहेबांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे ११ वेळा प्रतिनिधित्व केले आहे . ५५ वर्षे त्यांनी आमदार म्हणून काम केले आहे . काही काळराज्याचे मंत्री म्हणुन तर काही काळ एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहीले आहे . तसेच राज्यसरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यावरही त्यांनी काम पाहीले आहे . स्व . आबासाहेबांनी एवढे दिर्घकाळ लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्या पदांचा वापर कधीही स्वताच्या स्वार्थासाठी केला नाही . 

किंवा कधीही डामडौल न करता गाजावाजा न करता त्यांनी संपुर्ण आयुष्यात निःस्वार्थ पणे सेवा केली . संपूर्ण आयुष्यात राजकीय सामाजीक क्षेत्रात काम करीत असताना कुठलाही डाग अंगाला लागु न देता स्वताचे चरित्र त्यांनी जपले . एवढी निःस्वार्थपणे जनसेवा करणारे सध्या स्थितीत सापडणे कठीण आहे . सध्या राजकारणामध्ये निष्ठा , चारित्र्य , त्याग ह्या गोष्टी हुडकून सापडणे कठीण आहे .

 सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे समीकरण सगळीकडे पहावयास मिळत आहे . परंतु स्व . आबासाहेबांनी सत्तेतून धन दौलत कधीमिळवली नाही . कुठला स्वार्थ साधला नाही . सध्याच्या राजकारणामध्ये अमाप संपत्ती मिळवणारे अनेक नेते पहावयास मिळत आहेत त्यांच्या राहणीमानमध्ये आमुलाग्र बदल पहावयास मिळत आहे . मात्र आबासाहेब हे या पासुन कोसो दूर राहिले . साधी राहणी व उच्च विचारसरणी ही त्यांनी आयुष्यभर जपली . 

आबासाहेब हे काही अपवाद वगळता कायम विरोधी पक्षात राहिले आहेत तरीही त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही . विचारांशी प्रतारणा केली नाही . सर्व राष्ट्रीय पुरुषांच्या विचारावर आबासाहेबांनी आपली राजकीय , सामाजीक वाटचाल केली आहे . आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षामध्ये राहूनच त्यांनी जनसेवा केली . त्यांनी कुठल्याही परिस्थितीत पक्ष बदलला नाही . त्यांना कितीतरी सत्ताधारी पक्षाकडून आमिषे प्रलोभने आली परंतु त्या प्रलोभनांना आबासाहेब कधीही बळी पडले नाहीत . 

ज्या जनतेने निवडून दिले त्याजनतेचा विचार विनिमय घेतल्याशिवाय त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही . जनता जनार्धनांचा विश्वासघात कधीही नाही . आशा के ला ह्या लोकनेत्याच्या कार्याचा आदर्श , बारसा इतरही लोकप्रतिनिधींनी व इतर कार्यकर्त्यांनी घ्यावा यासाठी व स्व . आबासाहेबांचे आदर्शवत काम जनतेसमोर रहावे यासाठी स्व . आबासाहेबांचा पुतळा स्मारकाच्या रुपाने राज्याच्या विधानसभेच्या आवारात उभा करावा ,

 अशी मागणी सध्याचे उपमुख्यमंत्री व त्यावेळचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती तीच केलेली मागणी आत्ता आपण सत्तेत आहात आपण ती पुर्ण करावी . सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्याच्या त्या वेळच्या मागणीचा विचार करावा व सध्याच्या उप मुख्यमंत्र्यांनीही आपणच केलेली मागणी सत्तेच्या माध्यमातून त्वरित पुर्ण करण्याची मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली .

Post a Comment

0 Comments