google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मतदार ओळखपत्रही ‘आधार’शी लिंक होणार, ‘असं’ करा लिंकिंग…!!

Breaking News

मतदार ओळखपत्रही ‘आधार’शी लिंक होणार, ‘असं’ करा लिंकिंग…!!

 मतदार ओळखपत्रही ‘आधार’शी लिंक होणार, ‘असं’ करा लिंकिंग…!!

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक केल्यानंतर आता मतदार ओळखपत्रही आधार कार्डशी जाेडले जाणार आहे.. त्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून खास मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली..


अनेक ठिकाणी मतदार यादीत सदोष असल्याचे आढळून आले आहे.. त्यात मतदार यादीत दुबार नावे असणे, मतदारांचा पत्ता अपूर्ण असे दोष समोर आले आहेत. त्यामुळे मतदार याद्या पारदर्शक करण्यासाठी मतदार ओळखपत्राला (Voter id) आधार कार्डशी (Aadhar card link) लिंक केले जाणार आहे. एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव आहे का, हे तपासण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे.

मतदार याद्या पारदर्शक होणार

एखाद्याचे नाव त्याच्या शहराच्या मतदार यादीत असते, पण बराच काळ दुसऱ्या शहरात राहिल्यानंतर त्याचे नाव त्या शहरातील मतदार यादीतही येते.. मात्र, मतदार ओळखपत्र ‘आधार’शी लिंक केल्यानंतर मतदाराचे नाव एकाच ठिकाणी राहिल.. पर्यायाने त्याला फक्त एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.


मतदार यादीत केल्या जाणाऱ्या या नवीन बदलाची माहिती देण्यासाठी उद्या (ता. 26) सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. कोणाचाही आधार क्रमांक ‘पब्लिक डोमेन’मध्ये जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. आधार क्रमांकाला ‘मास्किंग’ केले जाईल.. तसेच एकसारखेच फोटो शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केलंय. त्याद्वारे आतापर्यंत 40 लाख मतदारांचे ‘व्हेरिफिकेशन’ करण्यात आलं असून, तब्बल 20 लाख बनावट नावे आढळल्याची माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली..


आधार-मतदार कार्ड लिंकिंग

– मतदार ओळखपत्र हे आधारशी लिंक करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 6 ‘ब’ तयार केलाय. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर हा अर्ज अपलोड केलेला आहे.

– ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवरही हा अर्ज उपलब्ध असेल. मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्रमांक 6 ‘ब’द्वारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

– आधार क्रमांक नसल्यास नमुना क्रमांक 6 ‘ब’मध्ये नमूद केल्याप्रमाणे 11 ओळखपत्रांपैकी कोणताही एक सादर करता येईल.

Post a Comment

0 Comments