' आईला माझ्या मयतावर रडू देऊ नका " , असे म्हणत १६ वर्षीय मुलाने केली आत्महत्या !
सोलापूर : सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील बोपले गावात शिक्षणासाठी पुणे शहरात पाठवत नसल्याने आजोबांकडे राहत असलेल्या एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केली . सिद्धार्थ नामदेव लंगर ( वय १६ ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे . याबद्दल अधिक माहिती अशी कि , आत्महत्येपूर्वी सिद्धार्थने आपल्या वडिलांना फोन केला होता . वडिलांशी फोनवर बोलता बोलता आईला माझ्या मयतावर रडू देऊ नका , असे म्हणत त्याने फोन कट केला . मृत सिद्धार्थचे वडील नामदेव हे लाँकडाऊनपूर्वीकुटुंबासमवेत पुणे येथे राहत होते . तिथेच मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण करीत होते . त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा पुण्यात शिक्षण घेत होता . कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे सिद्धार्थच्या वडिलांच्या हातचे काम गेले . त्यामुळे आता शहरात कुटुंबाचा आपल्या राहून उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सिद्धार्थच्या वडिलांना पडला . अखेर त्यांनी पुणे शहर सोडून आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला . सिद्धार्थचे वडील नामदेव लंगर हे कुटुंबासमवेत परत मूळ गावी बोपले येथे राहायला आले .त्यादरम्यान त्यांनी सिद्धार्थ याला शाळेसाठी बोपले गावात आजोबा नवनाथ लंगर यांच्याकडे ठेवले . त्यानंतर दक्षिण आहेरवाडीला ते सोलापूर गेले . लॉकडाऊन उघडताच शाळा सुरू झाल्यापासून सिद्धार्थ हा आई वडिलांना फोन करून आपण पुणे येथे शाळेसाठी जाऊ , असे सांगत होता . त्याच्या आई - वडिलांनी जायचे नाही , इकडेच राहू , असे सांगितल्याने तो नाराज होता . मोलमजुरीसाठी तालुक्यात दरम्यान , नैराश्यातून फोनवर या दरम्यान , सिद्धार्थने वडिलांशी बोलता - बोलता आईला माझ्या मयतीवर रड़ देऊ नका , असेम्हणत त्याने फोन कट केला . त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली .


0 Comments