` राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय !
नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे . त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे . द्रौपदी मुर्मू यांना 812 मते तर यशवंत सिन्हा यांना 521 मते मिळाली . राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील .
द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील . देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे . दरम्यान , मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना 540 मते मिळाली होती . या मताचे मूल्य 3,78,000 इतके होते . तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली होती , त्यांच्या मताचे मूल्य हे 1,45,600 इतके होते . दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना 1349 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 537 मते मिळाली .


0 Comments