Breaking News

अरेरे ! चॉकलेटने घेतला चिमुकलीचा बळी

 अरेरे ! चॉकलेटने घेतला चिमुकलीचा बळी


लहान मुलांना चॉकलेट आवडत असेल तरी हे चॉकलेट कधी जीवघेणे ठरेल , सांगता येत नाही . अशीच एक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे . कर्नाटकातील उड्डुपी जिल्ह्यात बुधवारी एका 6 वर्षीय चिमुकलीचा चॉकलेट घशात अडकल्याने मृत्यू झाला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , चिमुकली ( समन्वी पुजारी ) तिच्या घरी जात होती . यावेळी शाळेच्या बसमध्ये चढत असताना तिने चॉकलेट रॅपरसह गिळले , त्यामुळे तिचा मृत्यू झाला . समन्वी सकाळी शाळेत जाण्यास तयार नव्हती . यावेळी तिच्या आई , वडील आणि कुटुंबियांनी तिला जाण्यासाठी कसेतरी पटवले , यावेळी आई सुप्रिता यांनी समन्वीला एक चॉकलेट दिलं आहे . यावेळी शाळेची व्हॅन आली , हे पाहून समन्वीने रॅपरसह पटकन चॉकलेट खाल्ले . मात्र चॉकलेट रॅपरसह गिळल्याने गुदरमरुन ती बसच्या दरवाजात बेशुद्ध पडली . बसचा चालक आणि कुटुंबीयांनी समन्वीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला , मात्र ती शुद्धीवर

याचा प्रयत्न केला , मात्र ती शुद्धीवर आलीच नाही . यावेळी कुटुंबियांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले . मात्र रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे . समन्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मणिपाल केएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांदूर पोलिसांचे म्हणणे आहे की , शवविच्छेदन अहवाल आल्या नंतरच मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होईल .

Post a Comment

0 Comments