google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नवनाथ पवार यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये , त्यांच्या - त्यांच्या प्रभागापुरते बघावे : अस्मिरभाई तांबोळी

Breaking News

नवनाथ पवार यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये , त्यांच्या - त्यांच्या प्रभागापुरते बघावे : अस्मिरभाई तांबोळी

 नवनाथ पवार यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये , त्यांच्या - त्यांच्या प्रभागापुरते बघावे : अस्मिरभाई तांबोळी

सांगोला /  सांगोला शहरामध्ये पूर्वीचे १० प्रभाग होते . १० प्रभागांमधील २० त्या त्या नगरसेवकांनी आपल्या कुवतीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या प्रभागात कामकाज केले असताना गेली पाच वर्षे झोपी गेलेले नवनाथ पवार यांनी गेली आठ दिवस सांगोला शहरातील १ ते ११ या प्रभागात जाऊन नागरिकांच्या घरोघरी जाऊन तुमचे काय प्रश्न असले तर मला सांगा

 असे म्हणून नागरिकांच्या गळी उतरण्याचा खोटा प्रयत्न चालवला असून अर्ज देऊन पेपरबाजी करून श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत . असा हा जनतेविषयी असणारा खोटा कळवळा दाखवणे त्यांनी तात्काळ थांबवावे असा सल्ला सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक अस्मीर भाई तांबोळी यांनी दिला आहे . सांगोला शहरांमध्ये गेली पाच वर्षे सातत्याने ज्या त्या नगरसेवकांनीआपआपल्या प्रभागांमध्ये आपल्या पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे . 

प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत . असे असताना पाच वर्षे गायब असलेले माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांनी गेली आठ ते दहा दिवस सातत्याने प्रभाग एक ते नव्याने झालेल्या प्रभाग अकरा पर्यंत नागरिकांच्या घरीजाऊन तुमचे काय प्रश्न आहेत का विचारून त्या नागरिकांचे प्रश्न त्या प्रभागातील नगरसेवकांशी चर्चा न करता मुख्याधिकारी सांगोला नगरपालिका सांगोला यांना निवेदने दिली आहेत . या निवेदनामध्ये दिलेले रस्ते , गटारी , पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची कामे ही काही कामे पूर्ण झाली आहेत , काही तांत्रिक मंजुरीला गेले आहेत , काही प्रशासकीय मंजुरीला गेले आहेत ,

 काहीजणांची कामे पूर्ण असतानासुद्धा श्रेय लाटण्याच्या हेतूने शहानिशा न करता नवनाथ पवार यांनी मुख्याधिकारी सांगोला यांना निवेदन देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू केला आहे . नवनाथ पवार यांनी श्रेयवादवाद न करता तुमच्याकडे आलेल्या नागरिकांची आणि तुमच्या प्रभागातील कामे करा असाही सल्ला माजी नगरसेवक अस्मीर भाई तांबोळी यांनी दिला आहे .

Post a Comment

0 Comments