google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग न्युज- राज्यात भारतीय जनता पार्टी विरुद्ध लढ्यात “उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात, सुषमा अंधारे यांचा पक्षप्रवेश..

Breaking News

ब्रेकींग न्युज- राज्यात भारतीय जनता पार्टी विरुद्ध लढ्यात “उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात, सुषमा अंधारे यांचा पक्षप्रवेश..

 ब्रेकींग न्युज- राज्यात भारतीय जनता पार्टी विरुद्ध लढ्यात “उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात, सुषमा अंधारे यांचा पक्षप्रवेश.. 

-उद्धव ठाकरे यांची, "शिवसेना उपनेतेपदी मा.सुषमाताई अंधारे यांची नियुक्तीची घोषणा..

काल राजकीय मोठ्या घडामोडीमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या धुरंधर नेत्या- सुषमाताई अंधारे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचं स्वागत करताना शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं आहे. तेव्हा यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.


यावेळी मा.सुषमाताई अंधारे यांनी चालू राजकीय घडामोडीवर भाष्य करताना सांगितले की, उच्चवर्णीय यांची पार्टी जर -ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथं संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशावेळी भाजपविरोधात निकरानं झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही धर्मनिरपेक्षतावादी लोकांनी असलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय म्हणून मी विचारपूर्वक शिवसेनेत आपल्या प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.


सद्या हजारो  वर्ष उच्चवर्णीय  फोडा अन राज्य करा हेच सूत्र वापरून राजे, देव, दानव ,मानव,अनेक संस्थानिक,पूजारी, मठपती, कथा-कल्पना इत्यादी  माध्यम वापरून/पासून आता राजकीय गुलामगिरी करण्याची 90%हिंदुस्थानात लोकांची मानसिकता लक्ष्यात घेऊन पुन्हा इतिहास पुनरावृत्ती, पेशवाई – धर्म विषयी प्रेम कटकारस्थान जागृत झाले आहे ,या पार्श्वभूमीवर सद्या वरील घटना महत्वपूर्ण मानली जात आहे.


यावेळी ज्याक्षणी उद्धव ठाकरे यांनी जेव्हा म्हटलं होतं की, माझं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही, त्याक्षणी चांद्यापासून बांद्यापर्यंत जोडला गेलेले कार्यकर्ते माझ्यासोबत शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असंही यावेळी अंधारे यांनी सांगितलं. माझ्या डोक्यावर ईडीचं ओझं नाही, मी आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून जो लौकिक मिळाला आहे. त्यानुसार मी काम करत राहिन. आज जोरजोरात रडायचं आणि उद्या दुसऱ्या गटात सामिल व्हायचं हे माझ्याकडून होणार नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगले अशा अर्थानं मी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करत आहे, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या आहेत.


दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले, सुषमाताई आणि तुमचे लढणारे सैनिक माझ्यासोबत आलेत तेही लढाई ऐन भरात असताना. या साथीसोबतीला महत्व आहे. तीर्थप्रसादाला तर सर्वजण येतात पण लढाईत खांद्याला खांदा लाऊन जे येतात त्यांचं महत्वा आयुष्यभर राहतं. खऱ्याखुऱ्या शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अस म्हणाले आहेत.

सद्या शिवसेनेत कट्टर-पक्ष -नेतृत्व आणि संघटन याविषयी राजकीय जोरदार चर्चा चालू असताना असेच

दलित पँथर पासून रिपब्लिकन पार्टी,बहुजन पक्ष इत्यादी विविध पक्ष उच्चवर्णीय यांनी फोडा अन राज्य करताना झालेली वाताहत कोणी विचारात घेत नाही


तसेच काँग्रेस पासून कोणताही विरोधक ,किंवा पक्ष ,जनता बोलणारी नको पण एकतर्फी भारतीय जनता पार्टी हुकूमशाही धोरण आता लोकशाही मारक ठरत असताना,धर्म नावाने राज्य करताना लोकशाही धोक्यात आली आहे हे त्रिवार सत्य कोणी नाकारू शकत नाही


अशी जनतेत चर्चा आहे.यापूर्वीच संजय राऊत पासून बारामती,पपू ,काँग्रेस,बाजारू इत्यादी  कारण सांगणारे  धर्मवीर राजकिय अभ्यासक-आता मा. सुषमा ताई अंधारे यांना भारतीय जनता पार्टी यांना उच्चवर्णीय  आता धर्म आणि संविधान नेमकं टीका टिपण्णी कस रोखतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.यात त्यांची पूर्वीचे धर्म आणि अभ्यासपूर्ण भाषण यांचं अभ्यास प्रसार वाढणार हे नक्की आहे.

Post a Comment

0 Comments