google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यार्थ्यांनों, शिक्षणासोबत मानसिक व सामाजिक दृष्टया मजबूत व्हा…एसपी तेजस्वी सातपुते यांचे आवाहन

Breaking News

विद्यार्थ्यांनों, शिक्षणासोबत मानसिक व सामाजिक दृष्टया मजबूत व्हा…एसपी तेजस्वी सातपुते यांचे आवाहन

 विद्यार्थ्यांनों, शिक्षणासोबत मानसिक व सामाजिक दृष्टया मजबूत व्हा…एसपी तेजस्वी सातपुते यांचे आवाहन

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या वतीने गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, बीडीओ वाघ, पतसंस्था चेअरमन हरिबा सपताळे, व्हाईस चेअरमन धनंजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.


या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबवून बेकायदेशीर हातभट्टी काढणाऱ्या कुटुंबाना इतर व्यवसायाकडे वळणाऱ्या एसपी सातपुते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तिरंगा झेंडा, एक रोप व भेटवस्तू असे सत्काराचे स्वरूप होते. एसपी सातपुते मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, मुलांनी मार्क चांगले घेतले मात्र आता मानसिक व सामाजिक दृष्ट्या मजबूत व्हा असे आवाहन करत पालकांना ही त्यांनी विविध सूचना केल्या पहा त्या काय म्हणाल्या….


सीईओ स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, पतसंस्था ही आर्थिक विकासासोबत सामाजिक उपक्रमात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार काढले. आपल्या शिक्षण विभागाच्या दशसूत्रीबाबत सांगताना त्यांनी विद्यार्थी व पालकांनी अनुकरण करण्याचे आवाहन केले पहा ते काय म्हणाले..

प्रारंभी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज यांनी स्पष्ट केला. सूत्रसंचालन तज्ञ संचालक डॉ एस पी माने यांनी केले.आभार व्हाईस चेअरमन राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाला पतसंस्थेचे सर्व संचालक, सचिव व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments