Breaking News

खळबळजनक!लाच स्विकारल्याप्रकरणात मंगळवेढ्यातील 'तो' अधिकारी निलंबित

   खळबळजनक!लाच स्विकारल्याप्रकरणात

मंगळवेढ्यातील 'तो' अधिकारी निलंबित 

मंगळवेढा येथील पुरवठा विभागातील पुरवठा निरिक्षक उत्तम वामन गायकवाड  यांनी  1200 रुपये मासिक हप्त्याची लाच स्विकारल्या प्रकरणात लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली होती.

दरम्यान, पुरवठा निरिक्षक या कालावधीत 48 तासाहून अधिक काळ कारागृहात राहिल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत जिल्हाधिकारी यांनी निलंबीत केले असून तसा आदेश मंगळवेढा तहसीलला प्राप्त झाला आहे.

या घटनेची हकिकत अशी, यातील निलंबीत पुरवठा निरिक्षक उत्तम गायकवाड हे मंगळवेढा येथील पुरवठा विभागात कार्यरत होते.

दि.27 मे रोजी यातील स्वस्त धान्य दुकानदाराने लाचेबाबत सोलापूर येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा लावण्यात आला होता.यावेळी पुरवठा निरिक्षक गायकवाड यांच्या वतीने मासिक हप्ता म्हणून 1200 रुपयांची लाचेची मागणी करीत संगणक चालक यादव याने ती रक्कम स्विकारली असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.


यावेळी ही रक्कम पुरवठा निरिक्षकांकडे देणार असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी दोघांना भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7 अ नुसार दि.27 मे रोजी सायंकाळी 4.24 मिनीटानी गुन्हा दाखल करून अटक केली होती.

याचा अहवाल लाच लुचपत विभागाने  जिल्हधिकारी कार्यालयास पाठविण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 चे नियम 4(1)(क) अन्वये प्राप्त अधिकारानुसार


दि.27 मे पासून गायकवाड यांना सेवेतून निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले असून हा आदेश नुकताच मंगळवेढा तहसील कार्यालयास प्राप्त झाला आहे.दरम्यान त्यांची बदली माढा येथे करण्यात आली असून पुर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये तसेच निलंबन कालावधीत खाजगी नोकरी स्विकारू नये अथवा धंदा करू नये तसे केल्यास दोषारोपास पात्र रहाल असे आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments