Breaking News

मानभूमी ऑग्रो प्रोडूसर कंपनी लि.कडलास येथे पिक मूल्यसाखळी विकास कार्यक्रमांतर्गत मका पिकाची शेतीशाळा संपन्न ...

 मानभूमी ऑग्रो प्रोडूसर कंपनी लि.कडलास येथे पिक मूल्यसाखळी विकास कार्यक्रमांतर्गत मका पिकाची शेतीशाळा संपन्न ...

सांगोला प्रतिनिधी, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीर्वत प्रकल्प (स्मार्ट)योजने आंतर्गत मानभूमी फार्मर फोड्यूसर कंपनी लि.कडलास या संस्थेच्या 30 सभासद शेतकऱ्यांची शेतीशाळा संपन्न झाली सदर शेतीशाळेस श्री वळकुंडे तानाजी,कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र मोहोळ, श्री.जाधव शरद,ऍग्रोनॉमिस्ट,कृषि विज्ञान केंद्र ,मोहोळ यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास 


श्री.भंडारे मंडळ कृषि अधिकारी जवळा व कंपनीचे संस्थापक अमोल गायकवाड शेतकरी पुरूष व महीला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती,सदर शेतकऱ्यांना श्री वळकुंडे व श्री जाधव यांनी मका पिका संदर्भात उत्पन्न वाढिसाठी व मका पिकाच्या मूल्यासाखळी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

      प्रत्येक 15 दिवसाला शेती शाळा घेण्याचा सल्ला दिला,कंपनीच्या मका ज्वारी मुरघास प्रकल्पाची सविस्तर महीती दिली, सदर कार्यक्रम श्री.एम.डी.पोळ,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,सांगोला व श्री.एस. एस. सोनवणे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments