Breaking News

सांगोला पोलीसांनी सांगोल्यात हातभट्टी दारुअड्ड्यावर धाड

सांगोला पोलीसांनी सांगोल्यात हातभट्टी दारुअड्ड्यावर धाड


 सांगोला : बेकायदेशीररित्या हातभट्टी दारु तयार करणाऱ्या २ अड्ड्यावर पोलिसांनी अचानक घाड टाकून गूळ - नवसागरमिश्रित रसायन , हातभट्टी दारु , गूळ आणि नवसागर असा सुमारे १ लाख ३८ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर गूळमिश्रित रसायन जागेवर नष्ट केले . कारवाईदरम्यान पोलिसांना पाहताच दोघेही तेथून पळून गेले . ही कारवाई २१ रोजी दुपारी ४ च्या सुमारास हातीद , ता . सांगोला येथील चव्हाण मळा येथे केली . 


याबाबत पोलीस नाईक . बाबासाहेब पाटील यांनी लक्ष्मण नामदेव चव्हाण व आकाराम नामदेव चव्हाण , रा.हतीद ता . सांगोला या सख्ख्या भावाविरुद्धगुन्हा दाखल केला . सांगोला स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब माने , पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे , पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ पोलीस नाईक राहुल देवकाते पोलीस नाईक बाबासाहेब पाटील असे सर्वजण मिळून गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास कोळा दूरक्षेत्रामध्ये गस्तीवर असताना हातीदमध्ये आले 


असता त्यांना बातमीदारामार्फत चव्हाण मळा येथे लक्ष्मण चव्हाण हा त्याच्या रहाते घरासमोरील झाडीत चोरून हातभट्टी दारूची भट्टी चालवित असल्याचे माहिती मिळाली . होती . सदर ठिकाणी पोलीसांनी अचानक घाड टाकली असता त्या चिलारीच्या झुडपामधून पूर येतानादिसला तर तो भट्टीला जाळ घालून हातभट्टी काढत होता . मात्र पोलीसांना पाहताच तो चिलारीच्या झाडामधून ओढ्याच्या दिशेने पळून गेला . 


पोलीसांनी याठिकाणी रसायन , गूळ- नवसागरमिश्रित रसायन , हातभट्टी दारू , गुळ आणि नवसागर असा सुमारे ६४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर त्याचा सख्खा भाऊ आकाराम चव्हाण हाही तेथेच थोड्या अंतरावर गावातील ओढा नजीक चव्हाण वस्ती येथे चोरून बेकायदेशीर रित्या हातभट्टी चालवित होता .


 त्या ठिकाणी पाड टाकली असता पोलिसांना लावून पाहताच तो चिलारीच्या झाडामधून ओढ्याचे दिशेने पळून गेला . या कारवाईत पोलीसांनी रसायन , गूळ- नवसागर मिश्रीत रसायन , हातभट्टी दारू , गुळ आणि

Post a Comment

0 Comments