google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता मतदार कार्ड होणार ' आधार ' शी लिंक निवडणूक शाखेची मोहीम : १ ऑगस्ट पासून मोहीम सुरु होणार , मतदारांना आवाहन

Breaking News

आता मतदार कार्ड होणार ' आधार ' शी लिंक निवडणूक शाखेची मोहीम : १ ऑगस्ट पासून मोहीम सुरु होणार , मतदारांना आवाहन

 आता मतदार कार्ड होणार ' आधार ' शी लिंक निवडणूक शाखेची मोहीम : १ ऑगस्ट पासून मोहीम सुरु होणार , मतदारांना आवाहन

 अहमदनगर मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्याची मोहीम १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे . त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे . मतदार कार्ड आधार कार्डशी जोडणे ऐच्छिक असले तरी प्रत्येकाने मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करावे , असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आलेअर्ज मिळविण्यासाठी काय कराल ? मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहेत .

 त्यामुळे मतदारांना इलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे . तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही , त्यांच्यासाठी स्थानिक तळीवर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे . भरलेला अर्जही तेथेच जमा करता येणार आहे . मतदार कार्डसोबत आधार कार्ड लिक केल्यानंतर मतदार यादी अधिक अचूक होणार आहे . त्यामुळे प्रत्येकाने मतदार कार्डसोबत आधार कार्ड लिक करून घ्यावे . 

ही प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे . -जितेंद्र पाटील , उपजिल्हाधिकारी , निवडणूक ,जिल्ह्यात ३५ लाख मतदार विधानसभेच्या मे २०२२ पर्यंत अपडेट झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात ३५ लाख २८ हजार ५४२ मतदार आहेत . यात २८ लाख ३५ हजार ५७८ पुरुष मतदार , तर २६ लाख १२ हजार ८२० स्त्री मतदार आहेत . इतर मतदारांची संख्या १५४ आहे .अर्ज क्रमांक ६ द्वारे भरा माहिती मतदार कार्ड आधार कार्डशी लिक करण्यासाठी ६ क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार आहे . 

हा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येणार आहे . नवीन मतदार नोंदणी करताना अर्ज क्रमांक ६ भरावा लागणार आहे . तर जुन्या मतदारांना अर्ज क्रमांक ६ व भरावा लागणार आहे . संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध ज्यांना ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे . त्यांच्यासाठी अर्ज क्रमांक ६ हा स्थानिक पातळीवरील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असणार आहे . तसेच हा अर्ज सीईओडलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे . ज्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे . त्यांच्यासाठी तेथेच माहिती भरून अर्ज सबमिट करण्याची सुविधा असणार आहे .

Post a Comment

0 Comments