google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्याजवळ भयानक अपघात, वासूदचे दोघे ठार सांगोला – पंढरपूर रोडवरील मठ वस्तीजवळ हा अपघात घडला.

Breaking News

सांगोल्याजवळ भयानक अपघात, वासूदचे दोघे ठार सांगोला – पंढरपूर रोडवरील मठ वस्तीजवळ हा अपघात घडला.

 सांगोल्याजवळ भयानक अपघात, वासूदचे दोघे ठार सांगोला – पंढरपूर रोडवरील मठ वस्तीजवळ हा अपघात घडला.

अपघात घडतात रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ वाहने खोळंबून होती. अखेर दोन्हीही अपघातग्रस्त वाहणे पोलिसांनी बाजूला काढली. त्यानंतर कोल्हापूरकडे आणि पंढरपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली.

सांगोला शहराजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भरधाव ट्रक आणि स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. काही वेळापूर्वीच सांगोला – पंढरपूर रस्त्यावर हा अपघात घडला आहे. सांगोला – पंढरपूर रोडवरील मठ वस्तीजवळ हा अपघात घडला. सुशांत सुभाष केदार (२२) व शनिदेव प्रकाश केदार (२० दोघेही रा. वासुद ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत.

खर्डीकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या स्विफ्ट कारला मठवस्तीजवळ समोरून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. अपघात का भीषण होता की, स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. एम एच ४५ एन -५७०४ या स्विफ्ट कारमधून सुशांत केदार व शनिदेव केदार दोघेजण पंढरपूरकडून सांगोल्याकडे येत होते.या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दाखल झाल्यानंतर जखमींना तात्काळ शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघात घडतात रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ वाहने खोळंबून होती. अखेर दोन्हीही अपघातग्रस्त वाहणे पोलिसांनी बाजूला काढली. त्यानंतर कोल्हापूरकडे आणि पंढरपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली.

त्यानंतर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच केदार कुटुंबियांवर दु:खाचा डाेंगर कोसळला आहे. घरातील कर्ते तरुण अपघातात गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments