google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा . आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य वआदिवासी धनगर साहित्य समेलन सांगोला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ...

Breaking News

मा . आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य वआदिवासी धनगर साहित्य समेलन सांगोला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ...

  मा . आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य वआदिवासी धनगर साहित्य समेलन सांगोला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ...

 सम्मेलन महाराष्ट्र राज्य सांगोला दि . २३ व २४ जुलै २०२२ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक २३/२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि . सोलापुर येथे होणार आहे . साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले आहेत.



 या संमेलनाचे अध्यक्ष श्री आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत . प्रा . संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत . पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले . दूसरे साहित्य सम्मेलन २०१८ ला लातूर येथे झाले . तीसरे साहित्य सम्मलेन म्हसवड जि सातारा येथे २०१ ९ ला झाले . चौथे साहित्य सम्मलेन मा . आमदार गणपतराव देशमुख यांच्या इच्छेनुसार संगोला येथे जाहीर झाले होते . पूर्ण तैयारी झाली होती . पण कोविड १ ९ मुळे स्थगित करण्यात आले होते . 




हे सम्मलेन स्वर्गीय गाणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे . सर्व साहित्य सम्मेलन तीन दिवसाची झाली आहेत . २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावलेली आहे . या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची आपेक्षा आहे . या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत . 

शनिवार दिनांक २३/७/२०२२ रोजी साहित्य दिंडीचा कार्यक्रम सकाळी आठ तें साडे अकरा पर्यन्त असेल .मान्यवर हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल . दिंडी मधे ४० सजवलेले रथ असतील . स्थात ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी शिक्षक कलाकार असतील . यात जमातीचा इतिहास , धर्म , संस्कृति , साहित्य , रूढ़ि , परंपरा , चाली , रीती , शैक्षणिक प्रबोधन रथ , 

सजीव देखावे , लेजिम , भजनी मंडल , गाजे ढोल , शोभा यात्रा असतील . साहित्य नागरीचे नाव संत बाळु मामा नगरी असे असेल . तर ग्रन्थ दालनचे नाव संत कनकदास नगरी असे असेल . साहित्य पीठास कवी कालिदास पीठ असे नाव देण्यात येईल या सर्व नगरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल . उद्घाटन सोहळा दुपारी बारा ते तीन वाजे पर्यन्त असेल . उद्घाटन सोहळा मान्यवर यांच्या हस्ते होईल . 

भंडारा उधळून गजेडोलच्या गजरात येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल फ़क्त उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास राजकीय नेत्यांना परवानगी राहील उद्घाटन कार्यक्रम मधे संस्थापक सम्मलेन अध्यक्ष , सोलापुर जिल्हा पालकमंत्री लोकल आमदार , खासदार , साहित्यिक , सामाजिक , शैक्षणिक , उद्योग , प्रशासन विभागातील मान्यवर असतील ,

 तीन तास जमातीच्या विविध विषयायावर प्रकाश टाकतील नविन सहितिकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल . शिक्षण साहित्य पत्रकारिता वैद्यकीय सामाजिक , प्रशासन क्षेत्रातील १० आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल . स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार हा पुरस्कार माननीय नागो गाणार शिक्षक आमदार नागपूर यांना घोषितकरण्यात येत आहे . तसेच भारत देशयातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करणार आहोत 

आणि रोख एक लक्ष रुपये शाल श्रीफळ काटी घोंगडी देऊन धनगरजमाती मार्फत पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल . सम्मलेन अध्यक्ष यांचे भाषण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेल . दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजे पर्यन्त स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्र असेल . याचे उद्घाटन संगोला नगरीचे नगरधक्ष्य करतील . या मधे अहिल्या शिक्षणसंस्था सांगली आणि विवीध शाळा कॉलेजेस सहभाग घेतील . या मधे धनगरी गीते ओव्या , धनगरी नृत्य असतील . सायंकाळी ६ ते ८ वाजता परिसवांद आहेत . 

विषय : धनगर साहित्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम वक्ते : मा राम लांडे लेखक नवनाथ गोरे लेखक , प्रा मुकुंद वलेकर विषय धनगर सारा एक वक्ते संजय सोनवानी ईतिहास संशोधक , लेखक , रात्री ८ ते ११ कवी संमेलन होणार आहे . कवी संमेलन अध्यक्ष शिवाजी बंडगर ग्रामीण साहित्यिक हे असतील . सूत्र संचालन भरत दौंडकर कवी हे करतील ह भ प श्यामसुंदर महाराज कवी ही प्रमुख उपस्थिती असेल . कविसम्मेलनात ४० कवी भाग घेणार आहेत . 

रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील . विषय ; धनगरांचा राजकीय प्रवास वक्ते : एडवोकेट अण्णा राव वक्ते : पाटील , प्रा डॉ किसन माने . विषय : धनगर साहित्याकांची जबाबदारी , चिंतामणी सहस्त्रबुद्धे संपादक दै तरुण भारत सांगली डॉ मधुकर सलगरे लेखक लातुर . विषय : धनगर समाज्याच्या समस्या मिडिया लक्ष्य का वेधून घेत नाही .

 वक्ते : मा सुभाष बोंद्रे कार्यकारी संपादक दै . दिव्य मराठी . श्यामसुंदर सोन्नर महाराज वरिष्ठ पत्रकार विषय होळकर श्याहीच्या इतिहासातून काय घ्यावें वक्ते : प्रा डॉ यशपाल भिंगे , मा सुभाष माने मा संचालक सहकार पणन महामंडळ विषय : धनगर आरक्षण वक्ते मा सुभाष पाटिल खेमनार मा कृषि संचालक मा गणेश दादा हाके बीजेपी प्रवक्ते . विषय : महिलांची सामाजिक जबाबदारी डॉ ज्योति सुळ समाजीक कार्यकर्ती , डॉ स्नेहा सोन सोनकाटे , सौ रुक्मिणी गलांडे डीसीपी पुणे .

 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदार्या वक्ते तुषार ठोम्बरे अप्पर जिल्हाधिकारी , दिलीप पालवे निवृत्त कार्यकारी अभियंता . समारोप सोहळा : सांयकाळी ५ ते ७ या वेळेत घेण्याचे नियोजन केले आहे . प्रस्तावनेचे भाषण संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यु टकले हे करतील . ठराव ही मांडतील व त्याच्या प्रती उपस्थित लोक प्रतिनिधी यांना देतील . स्वागत अध्यक्ष संजय , शिंगाडे सर यांचे भाषण होईल . 

उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर सत्कार , स्वागत सोहळा होईल . मनोगत व्यक्त करतील . पुरस्कार वितरण सोहळा होईल व साहित्य संमेलन अध्यक्ष समारोप भाषण होईल . समारोप सोहळा प्रमुख पाहुणे यांचे भाषण झाले की आभार प्रदर्शन होईल . कार्यक्रम सांगता होईल . प्रमुख उपस्थिती मध्ये . श्री संजय सोनवणी लेखक , इतिहास संशोधक , पटकथा लेखक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिका व अध्यक्ष पहिले धनगर साहित्यसंमेलन सोलापूर . अध्यक्ष मा . मुरहरी केळे साहेब संत साहित्य लेखक ,

 व संचालक विद्युत वितरण महाराष्ट्र शासन व तिसरे साहित्य संमेलन म्हसवड अध्यक्ष प्रा.डा. यशपाल भिंगे प्राख्यत लेखक व वक्ते डा . अरूण गावडे , समाज सेवक . मा . आण्णासाहेब डांगे माजी मंत्री , मा.राम शिंदे माजी मंत्री व उपाध्यक्ष भाजप , मा . आमदार रामराव वडकुते , मा . आमदार हरिदास भदे , आमदार गोपीचंद पडळकर , मा . शरदश्चंद्र पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस . श्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री सोलापूर . प्रणिती ताई शिंदे आमदार सोलापूर . स्थानिक सर्व आमदार , खासदार . नगराध्यक्ष , महापौर सोलापूर , जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत .

 साहित्य संमेलनाची तयारी जोरदार चालू आहे . हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील जाती धर्मातील सन्माननीय मान्यवर यांच्या साठी सदैव खुले राहील . तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजन समिती मार्फत करत आहोत . साहित्य संमेलन वेबसाईट उघडल्यानंतर go to क्लिक करा . ( un admin /


आदिवासी धनगर साहित्य समेलन सांगोला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ... F दि . २३/२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जिल्हा सोलापूर येथे स्व . गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य समेलन होत आहे .

 हे संमेलन आहिल्यादेवी होळकर सभागृह आहिल्या नगर , सांगोला येथे होत आहे . हे संमेलन २ दिवस चालणार आहे . या संमेलनास राज्य व देशभरातून सर्व क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील साहित्यिक व बौध्दीक मंडळी हजेरी लावणार आहे . तसेच या संमेलनामध्ये इतिहास , साहित्य , संस्कृती , शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक , शेती , मेंढपालनांचे प्रश्न , याविषयी दोन दिवस चर्चासत्र आयोजित केलेली आहे . 

तसेच राज्यातील छोट्या मोठ्या जाती जमातीचे प्रश्न विचारपीठावरती चर्चेले जाणार आहेत . तसेच ज्या काही समस्या आहेत . प्रश्न आहेत यावरती ठराव करुन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे . दरवर्षी या साहित्य संमेलनामध्ये राज्यातील व देशातील तरुणांना एक आदर्श संदेश जावा यासाठी काही आदर्श व्यक्तींचा एैतिहासिक महापुरुषांच्या नावाने पुरस्कार देवून गौरविले जाते . याप्रमाणे खालील व्यक्तींना समितीमार्फत निवड करुन त्यांच्या विविध क्षेत्रातील आदर्श कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करत आहोत पुरस्काराचे स्वरुप -


काठी , घोंगडे , शॉल , श्रीफळ , प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे .  श्री . ना.गो. गाणार शिक्षक आमदार नागपूर यांना स्व . गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार जाहिर करण्यात येत आहे

श्री . बाळासाहेब वाघमोडे - आय.पी.एस.पोलिस अधिक्षक पालघर / ठाणे यांना सुभेदार मल्हारराव होळकर आदर्श प्रशासक पुरस्कार . श्री . तानाजी वाकडे व सौ . कल्पना वाकडे आदर्श माता , पिता पुरस्कार . अखंड होळकरशाही ग्रंथ लेखक उज्वलकुमार माने , सोलापूर या पुस्तकास आहिल्यादेवी होळकर आदर्श साहित्य पुरस्कार . डॉ . शिवाजीराव ढोबळे - आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार श्री.निवांत कोळेकर - सांगली बॅरीस्टर टी.के. शेंडगे , आदर्श शिक्षक व समाजसेवक पुरस्कार श्री.धुळाभाऊ कोकरे करमाळा 

महात्मा ज्योतिबा फुले आदर्श प्रयोगशील शेतकरी पुरस्कार दिलीपभाऊ एडतकर मालक व संपादक दैनिक विदर्भ मतदार आमरावती यांना कवी कालीदास जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत सचिन कवले समाजकल्याण उपायुक्त महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार मधुकर भरणे पुणे आदर्श उद्योजक पुरस्कार सौ . रुक्मिणी गलांडे पोलीस भीमाबाई होळकर आदर्श सेवा पुरस्कार . बाळासाहेब एरंडे सांगोला आदर्श समाजसेवा व उद्योजक पुरस्कार ,उपअधिक्षक , पुणे आद्य क्रांतीकारक,

 श्री आनंदा गोरख माने सामाजिक कार्यकर्ते राजमाता प्रतिष्ठान सांगोला,

 श्री मोहन मस्के सर संपादक दैनिक मानधूत एक्सप्रेस आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments