स्व.गणपतराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सांगोला येथे आदरांजली सभेचे आयोजन
सांगोला ( प्रतिनिधी ) : - शेतकरी कष्टकरी , वंचित , पीडीत व दीन दलितांच्या कल्याणासाठी स्व . गणपतराव देशमुख यांनी आपले जीवन समर्पित केले .
सांगोले तालुक्यासारख्या उजाड माळरानावर विकास झालाच पाहिजे , या ध्येयाने प्रेरीत होऊन कठोर परीश्रम करून तालुक्यातील जनतेला स्वयंभू बनवण्याचा सतत प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले . सत्तेचा मोह टाळून जनतेच्या ऋणामध्ये राहणे त्यांनी पसंत केले . शनिवार दि . ३० जुलै रोजी त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे . त्यांनी केलेल्या कामाचे सिंहावलोकन करता यावे आणि प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना वंदन करून त्यांच्या ध्येयपूर्तीमधील अपूर्ण राहिलेली
तालुक्यातील विकासकामे पूर्ण करून जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा करणेसाठी पुण्यस्मरण दिनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोले शेतकरी सहकारी सुत गिरणी प्रांगणामध्ये दुपारी १२-३० वाजता शेतकरी , कष्टकरी कार्यकर्त्यांची आदरांजली सभा ( मेळावा ) संपन्न होणार आहे . पुण्यतिथीनिमित्त दि . ३० जुलै रोजी रोजी सकाळी ९ वाजता भजन , कीर्तन , वृक्षारोपन , दुपारी १२ ०० वा . समाधीवर फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम , दुपारी १२-३० वाजता कार्यकर्ता मेळावा होणार असून दुपारी २-३० वा . भोजन कार्यक्रम होणार आहे .
त्याचप्रमाणे स्व . भाई . गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दि . १ ऑगस्ट रोजी महूद गटात रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . दि . २ ऑगस्ट रोजी एखतपूर गटात रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम , ३ ऑगस्ट रोजी शे.का. पक्ष वर्धापन दिन व शे.का. पक्ष कार्यालय , सांगोला येथे पक्षाच्या ७५ ज्येष्ठ कार्यकत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे . दि . ४ ऑगस्ट रोजी घेरडी गटात रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम , दि . ५ ऑगस्ट रोजी कोळा गटात रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम ,
दि . ६ ऑगस्ट रोजी सांगोला शहरात न्यू इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम , ७ ऑगस्ट रोजी चोपडी ( नाझरा ) गटात रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम , ८ ऑगस्ट रोजी जवळा गटात रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम , ९ ऑगस्ट रोजी कडलास गटात रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . त्यांचप्रमाणे दि . १० ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कूल , सांगोला येथे भाई गणपतरावजी देशमुख यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
सर्व कार्यक्रम प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे वतीने तालुका चिटणीस भाई दादासाहेब बाबर , शहर चिटणीस भाई अॅड . भारत बनकर , विभागीय चिटणीस भाई बाबासाहेब करांडे , माजी तालुका चिटणीस भाई विठ्ठलराव शिंदे , मध्यवर्ती समिती सदस्य भाई बाळासाहेब काटकर यांनी केले आहे .


0 Comments