google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा

Breaking News

मोठी बातमी ! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा

 मोठी बातमी ! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार , खासदार , नगरसेवक आणि पदाधिकारी एकापाठोपाठ एक पक्ष सोडून जात असतानाच उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी बातमी आहे . कारण ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे निहार ठाकरे हे शिंदे गटात सामील झाले आहेत . निहार ठाकरे यांनी शुक्रवारी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला . 


एवढेच नव्हे तर निहार हे शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत . त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे . निहार हे बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत . त्यांनी आज शिंदेयांची भेट घेतली . यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाच्या भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी किरण पावसकर हेदेखील उपस्थित होते . 


निहार यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आणखीनच हवा मिळू शकते . निहार हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत . काही महिन्यांपूर्वीच निहार आणि अंकिता पाटील यांना विवाह झाला होता . आता निहार हे राजकारणात आपले नशीब आजमवणार आहेत . निहार हे आतापर्यंत राजकारणात कधीच सक्रिय नव्हते .

Post a Comment

0 Comments