google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द , चिन्हही गोठवले !

Breaking News

राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द , चिन्हही गोठवले !

 राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द , चिन्हही गोठवले !

महाराष्ट्रातील दहा राजकीय पक्षांसह देशातील १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली असून पक्षाचे निवडणूक चिन्ह देखील गोठविण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे . 


महाराष्ट्रात शिवसेना हा पक्ष कुणाचा ? यावर आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे . शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले परंतु हा विषय सर्वोच्च न्यायालयात लटकलेला आहे . निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाच्या फडणवीस शिंदे भवितव्य सरकारचे अबलंबून असले तरी शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गोटात दाखलझाले आहेत . राज्यात देखील शिवसेना फोडण्याचे काम वेगाने सुरु असल्याचे दिसत असून शिंदे गटाने थेट शिवसेनेवरच दावा ठोकला आहे . 


आपण आजही शिवसेनेतच असून आपला गट म्हणजेच शिवसेना आहे असे शिंदे गटाचे म्हणणे आहे आणि हा विषय निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे . दोन्ही गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह देखील गोठवले जाऊ शकते असा जाणकारांचा अंदाज आहे . निवडणूक आयोगाने दरम्यान देशातील १११ राजकीय पक्षांची असून यात मान्यता रद्द केली महाराष्ट्रातील दहा राजकीय पक्षांचा समावेश आहे . 


राजकीय पक्षांची मान्यता रद्द करतानाच निवडणूक आयोगाने त्या पक्षांचे निवडणूक चिन्ह देखीलगोठविण्यात आले आहे . यात दिल्लीच्या ३३ तर उत्तर प्रदेशातील १० राजकीय पक्षांचा समावेश आहे . आसाम ८ , ९ , जम्मू काश्मीर बिहार - ६ , आंध्र प्रदेश ५ , ओरिसा - - ३ , गुजरात ३ , केरळ - ३ , मध्य प्रदेश ३ , पश्चिम बंगाल - २ , मिझोरम - २ , कर्नाटक - २ , हरियाणा - २ , पंजाब , हिमाचल प्रदेश , राजस्थान , झारखंड , मेघालय आणि उत्तराखंड या राज्यातील प्रत्येकी १ अशा १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करून त्यांचे निवडणूक चिन्ह गोठविण्यात आले आहे .


 यात महाराष्ट्र राज्यातील दहा पक्षांचा समावेश आहे . - - - महाराष्ट्रातील दहा पक्ष भारतीय आवाज पार्टी , वॉर वेतरणा पार्टी , जनादेश पक्ष मुंबई , पीपल्स पॉवर पार्टी , राष्ट्रीय लोक जागृती पार्टी , शेतकरी विचार दल ,भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष , विदर्भ विकास पार्टी , विदर्भ राज्य काँग्रेस अशा पार्टी , न्यूज महाराष्ट्रातील दहा राजकीय पक्षांचा समावेश आहे .

Post a Comment

0 Comments