google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मतिमंद तरुणीवर बलात्कार ; आरोपी निघाला हा माणूस ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोलापूरातील घटना....

Breaking News

मतिमंद तरुणीवर बलात्कार ; आरोपी निघाला हा माणूस ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोलापूरातील घटना....

 मतिमंद तरुणीवर बलात्कार ; आरोपी निघाला हा माणूस ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोलापूरातील घटना....

सोलापूर : ओळखीत असलेल्या मतिमंद  तरुणीला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना अक्कलकोट रोड परिसरात सोमवार 25 जुलै दुपारच्या सुमारास घडली. यात एकास अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणात एमआयडीसीच्या पोलिसांनी अजिज उर्फ अहमद गुलामदस्तगीर शेख वय ४५ रा. साईनगर याला अटक केली. त्याला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायालयाने आज मंगळवारी दिला.ती मतिमंद तरुणी अक्कलकोट रोड परिसरात राहण्यास असून मूक बधिर शाळेत शिक्षण घेते. तिच्या वडिलांच्या परिचयातील अजीज उर्फ अहमद शेख हा त्यांच्या घरी येत होता. आणि त्या मतिमंद मुलीला कधी कधी तिच्या घराजवळील दुकानातून खाऊ घेऊन देत होता.


सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अजिज उर्फ अहमद हा त्या मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलीची आजी घरात होती. थोडा वेळ बसल्यानंतर त्याने मुलीला सोबत घेऊन खाऊ आणतो असे सांगितले. आजीने नकार दिला असतानाही त्याने पाच मिनिटात आणतो, असे म्हणून तिला घेऊन गेला त्यानंतर दीड तासाने मुलीला घराजवळ सोडून बाहेरून निघून गेला. 

तेव्हा पिडीत मुलीने रडत रडत इशाऱ्याने घडला प्रकार आजीस सांगतिली. रात्री कामावरून घरी परतलेल्या पिडीतेच्या वडिलांना घडला प्रकार समजल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अजिज उर्फ अहमद शेख याला अटक करून पोलीस कोठडी घेतली. सहाय्यक निरीक्षक कुकडे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments