Breaking News

सांगोला तालुक्यासह शहरी भागासह इतर ग्रामीण भागामध्ये हि बकरी ईद उत्साहात साजरी.....

 सांगोला तालुक्यासह शहरी भागासह इतर ग्रामीण भागामध्ये हि बकरी ईद उत्साहात साजरी.....

कोळे / वाहिद आतार......गेली दोन ते तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी शर्तीमुळे बकरी ईद ही घरी साजरी होत होती परंतु  कोविड कालावधी संपल्यामुळे यावर्षी बकरी ईद कोळे ता.सांगोला येथे नमाज पठाण करून व मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा देऊन सांगोला तालुक्यातील शहरी भागासह  इतरत्र ग्रामीण भागात ही बकरी ईद उत्साहात साजरी झाली.

यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी व्हरे साहेब आणि पोलीस मित्र राजूभाऊ काटे उपस्थित होते. सदरच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस मित्र यांच्याकडून  ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांचे उपस्थित सर्व मुस्लिम बांधवाकडून आभार व्यक्त करण्यात आले व असेच सहकार्य आम्हाला वेळोवेळी करावे अशी विनंती ही मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले. कोळे गावचे डेप्युटी सरपंच डॉ. सादिक पटेल, असलम पटेल , मा. ग्रा. सदस्य बशीर खाटीक,युवक नेते रफिक (भाई)तांबोळी, फिरोज आता (सर) , अझर खाटीक, साजिद आतार, बापूलाल मनेर, इंनुस मुलाणी,सादिक आतार .. पत्रकार ..वाहिद आतार, इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments