पंढरपूरचे डिजीटललायझेशन करणार ; पंढरपूर शहराचा संपूर्ण कायापालट होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक महापूजा केली आहे . या महापुजेनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंढरीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही दिली . त्याबाबत विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे .महापुजेनंतर भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले , " आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे .
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला , हे माझं भाग्य समजतो . लाखो वारकरी विठ्ठ नामाचा जयघोष करत महाराष्ट्रातील देहू , आळंदी , शेगाव आणि पैठण येथून पायी चालत पंढरीच्या पावनभूमीकडे आले आहेत . दरवर्षी न चुकता हे सगळं होत असतं . पण गेल्या दोन वर्षात करोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही . यावर्षी मोठा उत्साह वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळाला . आज याठिकाणी दहा लाखापेक्षा अधिक वारकरी आले आहेत . त्यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो .
"पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की , " राज्यातील शेतकरी , कष्ठकरी , गुंतवणूकदार , कामकार , उद्योजक समाजातील प्रत्येक घटकाला हे वर्ष वारकरी , शेतमजूर , आणि सुखाचं , आनंदाच आणि समृद्धीचं जावो , अशी प्रार्थना मी पांडूरंग चरणी करतो . कोविडचं संकट आता लवकरात लवकर जायला पाहिजे . करोनाची कायमस्वरुपी जाण्याची वेळ आली आहे .
पांडुरंगाच्या पुण्याईने ते जाईलं , " असंही मुख्यमंत्री म्हणाले .पंढरपुरच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की , देशभरातील विविध मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात . चांगले रस्ते , पिण्याचं मुबलक पाणी , शौचालये असतात . त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे . त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत . लाखो भक्त इकडे येत असतात ,
त्यामुळे यामध्ये कुठेही कमी पडणार नाही . लवकरात लवकर डीपीआर तयार झाल्यास शासन त्याना मंजुरी देईन . या ठिकाणाचं पावित्र्य कसं जपता येईल आणि ज्या सोयी - सुविधा द्यायच्या आहेत , त्यामध्ये कुठेही हात आखडता घेणार नाही , " असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले .


0 Comments