Breaking News

दहावी पास तरुणांना ‘सब इन्स्पेक्टर’ होण्याची संधी, एक लाखाहून अधिक पगार..!

 दहावी पास तरुणांना ‘सब इन्स्पेक्टर’ होण्याची संधी, एक लाखाहून अधिक पगार..!

तुम्ही जर दहावी पास झालेले असाल नि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 16 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे..

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP recruitment-2022) होत असलेल्या या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

एकूण जागा – 37

पुरुष – 32

महिला – 05

या पदासाठी भरती – उपनिरीक्षक (Sub Inspector) ग्रुप बीपगार

उपनिरीक्षक (निरीक्षक) या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.निवड प्रक्रिया..

लेखी परीक्षा, ‘पीईटी’ व ‘पीएसटी’द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी बोलावलं जाईल.शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

या भरतीसाठी दहावी पास व ‘सिव्हिल इंजिनीअरिंग’ डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्जदारांचे वय 20 ते 25 वर्षे असावे..

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2022असा करा अर्ज


इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in ला भेट द्यावी.

होम पेजवरील ‘नवीन नोंदणी’ पर्यायावर क्लिक करा.

ई- मेल आयडी लिहून नोंदणी करा.

ITBP SI Recruitment 2022 हा पर्याय निवडा.

सगळा तपशील व कागदपत्रे अपलोड करा.

योग्य तपशील भरल्यावर अर्ज जमा करा.

Post a Comment

0 Comments