जिल्ह्यातील एसटी बसवर असणार 'हर घर झेंडा' संदेश
सोलापूर, दि.१५ : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ११ ऑगस्ट ते१७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये 'हर घर झेंडा' उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील एसटी बसवरही संदेश देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर, सर्व शासकीय/निमशासकीय / खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात येणार आहे. याची जिल्हा प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील राज्य परिवहनच्या सर्व बस "हर घर झंडा" याच्या संदेशाने रंगविल्या जाणार आहेत.
पथकर व तपासणी नाके, प्रसार, ध्वनी व चित्रमुद्रण प्रणालीच्या माध्यमातून हर घर झंडा या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. ध्वनीचित्रमुद्रण (व्हिडीओ) प्रणालीद्वारे जिल्हांतर्गत प्रवासी बसेसमध्ये सांगितिक जाहिराती (जिंगल्स), ध्वनीमुद्रित ध्वजगीत वाजविणे, ध्वज संबंधित चित्रफित दाखविणे इ.कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर पटवर्धनकुरोली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी नोंदणी. पंढरपूर,दि.२० :- माझी शेती माझा सात बारा मीच भरणार माझा पिकपेरा ई-पीक पाहणी सप्ताह दिनांक 18 जानेवारी ते 25 जानेवारी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. 26 जानेवारी नंतर पीक पाणी नसलेल्या शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा उपलब्ध होणार नाहीत. पीक पाहणीची नोंद नसेल तर सातबारा कोठेही चालणार नाही खरेदी पीक कर्ज अनुदान विमा कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही फळपिके ऊस असतील त्यांनी संपूर्ण वर्षाचा हंगामात पीक पाहणी भरावी व ज्वारी गहू हरभरा भाजीपाला कलिंगड टरबूज मका व इतर पिकांची नोंद रब्बी हंगाम निवडून आजच आपल्या शेती पिकाची नोंदणी करून घ्यावी.
यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी कशी करायची याची माहिती देताना पटवर्धन कुरोली चे तलाठी श्री गणेश गवळी भाऊसाहेब, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, शेतकरी हरिभाऊ उपासे, अनिल जवळेकर, भैया नाईकनवरे, बालाजी जवळेकर, राजेंद्र नाईकनवरे, सौरभ जवळेकर व इतर शेतकरी उपस्थित होते.
जांबूड चंदनशिवे वस्ती येथील नागरिकांच्या सततच्या प्रयत्नांना अखेर आले यश रस्ताचे काम सुरु अकलूज प्रतिनिधी,दि.७ : सार्वजनिक रस्ता आडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करणारे यांना कायद्याची चपराक.जांबूड चंदनशिवे वस्ती ग्रामीण मार्ग ९८ ते चंदनशिवे वस्ती ग्रामीण मार्ग ४४८ जिल्हा परिषद मालकीचा रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी चंदनशिवे वस्ती येथील नागरिक मागील एक ते दीड वर्षापासून प्रयत्न करीत आहेत.
सदरचा रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांनी कित्येक आंदोलने उपोषणे केली आहेत. परंतु सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी चंदनशिवे वस्तीवरील काही नागरिक सदरचा रस्ता हा माझ्या वैयक्तिक मालकीचा असल्याचे सांगून सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अडथळा निर्माण करीत होते.परंतु चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांच्या दळणवळण करण्यासाठी इतर कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने संबंधित अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच कित्येक आंदोलने उपोषणे केली आहेत.
नागरिकांच्या प्रयत्नाला आज दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी यश आले असून सदरच्या रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आले.
२६ जानेवारी निमीत्त प्रथम एज्यकेशन फाऊंडेशनच्या वतीने दिपक ऐवळे व यावर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार प्राप्त बापुसाहेबठोकळे यांचा कमलापूर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न सांगोला प्रतिनिधी - नवघरे,दि.२६ :- आज आज ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या चालू असलेल्या शैक्षणिक वाचन व गुणवंत विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान देणारे दिपक ऐवळे कमलापूर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला
तसेच महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय राजश्री शाहू महाराज समाजसेवा सन्मान हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कमलापूर ग्रामस्थांच्या वतीने बापूसाहेब ठोकळे यांना सरपंच कलावतीमाई बंडगर, उपसरपंच देविदास ढोले, युवानेते बाबुराव बंडगर,केंद्रप्रमुख अमोगसिद्ध कोळी,मुख्याध्यापक मुलाणी गुरुजी, माजी सरपंच सदाशिव ऐवळे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब अनुसे, नितीन काळे, मधुकर तंडे व उपस्थितांच्या वतीने सत्कार शाल श्रीफळ फेटा बांधून करण्यात आला व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या रीडिंग वाचन कॅपचा उत्कृष्ट वाचन करणारी विद्यार्थिनी खटके हीचे वाचन सोहळा याठिकाणी संपन्न झाला.


0 Comments