सोलापूरच्या सिद्धेश्वर वूमन्स पॉलिटेक्निकच्या 27 विद्यार्थ्यांनींना अन्नातून विषबाधा ; हॉस्पिटलमध्ये दाखल
सोलापुरातील वसतिगृहातील विद्यार्थिनीना विषबाधा !
सोलापूर : एकाच वसतिगृहातील तब्बल २७ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना घडली असून या विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर येथील सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींना ही विषबाधा झाली असल्याचे समोर आले आहे. रूपाभवानी चौकाजवळ असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थिनी याच महाविद्यालयाच्या परिसरात असेलेल्या वसतीगृहात राहतात. रात्री वसतिगृहात जेवण करून या मुली झोपल्या परंतु मध्यरात्री त्यांना त्रास जाणवू लागला. मळमळ, उलट्या अशा प्रकारचा त्रास त्यांना झाला. मुलींना पोटदुखीचाही त्रास होत राहिला शिवाय रात्री उलट्या जुलाब असा त्रास देखील त्यांना झाला परंतु या मुली तशाच झोपी गेल्या. आज सकाळी त्यांनी नाष्टा घेतला परंतु त्यानंतर देखील त्यांना अशाच प्रकारचा त्रास जाणवत राहिला.
नाष्टा केल्यानंतर एकेका मुलीला त्रास होत होत मुलींची संख्या वाढू लागली आणि त्रास होणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या २७ वर पोहोचली. या घटनेने वसतिगृह प्रशासनात देखील खळबळ उडाली आणि त्यांनी या सर्व मुलीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यातील काही मुलीना सोलापूर येथील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची अधिक चौकशी केली जात आहे.या चौकशीनंतर नेमकी ही विषबाधा कशामुळे झाली याची माहिती समोर येणार आहे परंतु वसतीगृह वर्तुळात आणि विद्यार्थ्यांत या घटनेने खळबळ उडाली आहे.


0 Comments