बलवडी ग्रामपंचायत आरक्षण सोडतीवर आरपीआय ( आठवले ) चे युवक नेते संजय करडे यांची हरकत दाखल
सांगोला / प्रतिनिधी : बलवडी , ता . सांगोला येथील ग्रामपंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत दिनांक ६ जून २०२२ रोजी झालेली असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक ४ अनुसूचित जाती - जमातीसाठी राखीव जागा असतानाही प्रभाग क्रमांक १ मध्ये आरक्षण सोडत करण्यात आली आहे . प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती जमातीचे एकही कुटुंब वास्तव्यास नसताना त्यामध्ये चुकीची आरक्षण सोडत झाली आहे .
दिनांक १३ जून २०२२ पर्यंत यावर तहसील कार्यालयामध्ये हरकत दाखल करावी अशीसूचना केली होती . त्याप्रमाणे आज शेवटच्या दिवशी युवक नेते संजय करडे यांनी सांगोला तहसीलदार अभिजीत पाटील यांच्याकडे हरकत दाखल केली आहे . या हरकतीची तहसीलदार यांनी दखल घेऊन
त्वरित अहवाल तयार करून तहसील कार्यालयाकडे जमा करावा अशा सूचना संबंधितांना केल्या आहेत . सदरची हरकत दाखल करताना आरपीआय ( आठवले ) पक्षाचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते , आरपीआय ( आठवले ) युवक आघाडीचे सांगोला तालुका कार्याध्यक्ष सौदागर सावंत आदी उपस्थित होते .


0 Comments