Breaking News

आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्सची गरज संपणार, आता येतंय खास ‘असे’ ओळखपत्र..!

 आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्सची गरज संपणार, आता येतंय खास ‘असे’ ओळखपत्र..!

आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट.. अशी ओळखपत्रांची जंत्री सांभाळताना अनेकदा नाकीनव येतात.. मात्र, कोणतंही सरकारी काम असो, या ओळखपत्रांची मागणी केली जातेच.. बऱ्याचदा यापैकी एखादे कार्ड सोबत नसेल, तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.


नागरिकांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काळात देशातील प्रत्येकाकडे एकच ‘डिजिटल आयडी’ असेल. आधार , पॅन कार्ड  ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टसह सर्व कागदपत्रं त्याला लिंक असतील. त्यामुळे आधार, पॅन किंवा लायसन्ससाठी वेगळे आयडी देण्याची गरज राहणार नाही.


सध्या ‘इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय’ या नवीन तंत्रज्ञानावर काम करतेय. त्यासाठी या मंत्रालयाने ‘फेडरेटेड डिजिटल आयडेंटिटीज’ हे नवीन मॉडेल प्रस्तावित केलंय. आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच हे डिजिटल आयडी एका युनिक आयडीच्या स्वरूपात असणार आहे.


युनिफाइड डिजिटल आयडी अंतर्गत केंद्रासह विविध राज्यांची ओळखपत्रेही एकत्र ठेवता येणार आहेत. केवायसी(KYC) किंवा ई-केवायसी(eKYC) प्रक्रियेसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे. ई-केवायसीद्वारे थर्ड पार्टी सुविधांचा लाभ घेण्यासाठीही हे आयडी वापरता येणार आहे.


सर्व डिजिटल ओळखपत्र लिंक

सर्व डिजिटल ओळखपत्र एकमेकांशी लिंक करता येतील. त्यामुळे वारंवार व्हेरिफिकेशनची गरज पडणार नाही. केंद्र सरकारने हा प्रस्ताव ‘इंडिया एंटरप्राइज आर्किटेक्चर 2.0’ (IndEA) अंतर्गत सादर केला आहे. ‘इंडईए’ने 2017 मध्ये हे कार्ड प्रस्तावित केले होते. नंतर ते अपडेट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली..


ही नवीन प्रणाली भारतातील लोकांना सशक्त करील आणि त्यांना त्यांच्या आयडींवर अधिक नियंत्रण ठेवण्याची परवानगी देईल, अशा प्रकारे त्यांना विशिष्ट परिस्थितीत काय अनुकूल आहे ते निवडण्याची परवानगी मिळेल, असे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments