पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ' सावधान ' विवाहासाठी उपवर वधू मिळेना : शिक्षणामुळे अपेक्षा वाढल्या
पुणे : लग्नानंतर सुरुवातीचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतात . मात्र , पुणे जिल्ह्यातील एका तरुणाची लग्नाची हौस - मौज अवघे काही तासच टिकली , कारण , लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी पतीला लुटून पळाली . नवरीच्या गळ्यात घातलेलं दागिने घेऊन ती पसार झाली .
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आईला भेटायला जाते असं सांगून गेलेली मुलगी परतलीच नाही . मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्याने अनेक तरुणांना विवाहासाठी उपवर वधू मिळेनाशा झाल्या आहेत . त्यातून तरुणांचे लग्नाचे वय उलटून जात आहे . त्यात शिक्षणामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या . त्यातून घरी पैसा असला तरी तरुणाचे शिक्षण कमी असल्याचे कारण देऊन त्यांना नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे .
त्यातून मग ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणींकडे चौकशी सुरू होते . त्यातूनच मग मध्यस्थ म्हणून काम करणारे त्याचा गैरफायदा घेऊन अशा विवाहइच्छुक नरोबांना जाळ्यात अडकवितात . पुण्यातील हा तरुण छोटा व्यवसाय करून घर चालवत होता . मामाच्या मदतीने एका मध्यस्थाने स्थळ दाखविण्याचे ५० हजार रुपये घेतले , त्याने ३ मुलींचे फोटो पाठविले . त्यातील एका तरुणीला या तरुणानेपसंत केले . मुलीला दाखविण्याचा कार्यक्रम केला .
तेव्हा तिच्या आईने ३ लाख रुपयांची मागणी केली . त्यानंतर मामाच्या शेतात कोरोनाच्या सावटाखाली मोजक्या लोकांमध्ये लग्न लागले . दुसऱ्या दिवशी सत्यनारायणचीपूजा झाली . त्यानंतर नवरीच्या आईल फोन आला . तिने मामीची तब्येत खराब असल्याचे सांगितले . मुलीला लग्नात घातलेले ३ लाख ९९ हजार रुपयांचे दागिने घेऊन त्या दोघी निघून गेल्या त्या पुन्हा परतल्याच नाही .


0 Comments